घरठाणेकल्याणची सुभेदारी कोणाकडे? देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट...

कल्याणची सुभेदारी कोणाकडे? देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट…

Subscribe

मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा (Maharashtra assembly) निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर (Kalyan Lok Sabha Constituency) स्थानिक भाजपा नेत्यांनी दावा सांगितल्याने वाद निर्माण झाला होता. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंनी चूक मान्य केली, फडणवीसांचे जाहिरातीच्या वादावर भाष्य

- Advertisement -

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजपा युती एकत्रित लढविणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगितले जात असले तरी, काही महत्त्वाच्या जागा या कळीचा मुद्दा ठरणार आहेत. त्यातही कल्याण लोकसभा मतदारसंघावरून वाद सुरू होती. या मतदारसंघासाठी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. या मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि मुंब्रा-कळवा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपाच्या स्थानिक शाखा शिंदे पिता-पुत्रांच्या विरोधात आधीपासूनच आहेत.

या मतदारसंघासाठी माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची नावे आघाडीवर होती. राज्यशास्त्र तसेच लोकशाही विषयांचे अभ्यासक-चिंतक म्हणून ओळखले जाणारे विनय सहस्त्रबुद्धे हे मितभाषी आहेत. भाजपाचे वैचारिक धोरण ठरविणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक मानले जातात. रवींद्र चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू असल्याचे सांगण्यात येते.

- Advertisement -

हेही वाचा – ‘2024 मध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने खळबळ

याच पार्श्वभूमीवर अलीकडेच सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या जाहिरात प्रकरणावरून झालेल्या बैठकीदरम्यान कल्याणच्या जागेबाबतही चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेही उपस्थित होते. त्यावेळी मी यात लक्ष घालेन, असे आश्वासन फडणवीस यांनी शिंदे पिता-पुत्राला दिले होते. याच अनुषंगाने फडणवीस यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. शिंदे गटाकडेच कल्याण लोकसभा मतदारसंघ राहील, असे त्यांनी ‘दि इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -