घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंनी चूक मान्य केली, फडणवीसांचे जाहिरातीच्या वादावर भाष्य

एकनाथ शिंदेंनी चूक मान्य केली, फडणवीसांचे जाहिरातीच्या वादावर भाष्य

Subscribe

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचा फोटो असलेली जाहिरात वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापण्यात आली होती. ज्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज झाले होते.

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या दोघांचा फोटो असलेली जाहिरात वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापण्यात आली होती. “राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे” अशा प्रकारचा संदेश या जाहिरातीमधून देण्यात आला होता. यामध्ये एका सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचे लिहिण्यात आले होते. ज्यानंतर या जाहिरातीमुळे या युतीमधील आमदारांनी-खासदारांनी, नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) देखील या जाहिरातीमुळे नाराज झाल्याचे त्यावेळी त्यांनी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला लावलेल्या गैरहजेरीमुळे स्पष्ट झाले होते. पण त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी लगेच दुसऱ्या दिवशी युतीमधील महत्त्वाच्या नेत्यांचे फोटो असलेली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. पण त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. (Eknath Shinde admits mistake, Devendra Fadnavis gives clarification on advertisement case)

हेही वाचा – पहाटेच्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांचा आणखी एक गौप्यस्फोट, म्हणाले…

- Advertisement -

जाहिरातीच्या मुद्द्यावरून युतीमध्ये काहीच आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्या जाहिरातीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चूक मान्य केल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जाहिरातीच्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. ही जाहिरात छापून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी माझ्याशी संवाद साधला आणि चूक मान्य केली. आमच्या काही लोकांनी चूक केली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीमध्ये सांगितले.

तसेच, “आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ती जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी स्वत: माझ्याशी संवाद साधला. ती जाहिरात चुकीची छापली गेली. आमच्या लोकांनी चूक केली केली आहे. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदे आणि माझ्यात ज्याप्रकारचं घट्ट संबंध आहेत, ते कदाचितच युतीच्या सरकारमध्ये दिसतात.” असे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

“कारण मी कधीही त्यांचा (एकनाथ शिंदे) मान, सन्मान आणि शिष्टाचार मोडत नाही आणि तेही मी उपमुख्यमंत्री आहे, याची जाणीव मला कधीच होऊ देत नाहीत. आम्ही दोघांनी एक मर्यादा ठेवली आहे. त्यामुळे आम्ही पुढे जात आहोत. काही वेळा पार्टीत कमी बुद्धीचे लोक असतात, ते चुकीचं काम करतात. पण एवढ्या छोट्या चुकीसाठी आमच्यात मतभेद होतील किंवा सरकार पडेल, असं कुणाला वाटत असेल तर ते कधीही होऊ शकत नाही. आम्ही एका मोठ्या विचाराने आणि ध्येयाने हे सरकार स्थापन केलं आहे,” असेही विश्वासाने देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -