घरमहाराष्ट्रइतिहास टकराने वालो का लिखा जाता है, तलवे चाटने वाले संजय राऊत...

इतिहास टकराने वालो का लिखा जाता है, तलवे चाटने वाले संजय राऊत का नही- गुलाबराव पाटील

Subscribe

पुढे बोलताना ते म्हणाले की, जवळपास 37 ते 38 वर्षांपासून गावाकडे दसरा कसा साजरा होतोय आम्ही पाहिलेला नाही,

मुंबई : शिवसेना (शिंदे गट) दसरा मेळाव्यात बोलताना मंत्री गुलाबराव पटील यांनी ठाकरे गटावर निशाणा साधाला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारला जातोय. माझी उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, अजित पवारांनी आमच्यात येऊल लव्ह मॅरेज केलं त्यांच्याबाबत तुमचं काय मत आहे, असा सवाल त्यांनी केला. बाळसाहेबांची आठवण केल्याशिवाय आमच्यासारख्या शिवसैनिकांचा दिवस जात नाही. मुख्यमंत्री काम करत नाहीत असं म्हणतात. पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे, त्यातील मी एक शेतकरी आहे, असं ते म्हणाले. (Why is history written by confrontational people why not Sanjay Raut who licks the soles of his feet  Gulabrao Patil)

पुढे बोलताना ते म्हणाले की, जवळपास 37 ते 38 वर्षांपासून गावाकडे दसरा कसा साजरा होतोय आम्ही पाहिलेला नाही, सुलाभ शौचालयामध्ये आंघोळ करायची मराठी माणसाकडे वडापाव खायचा आणि संध्याकाळी चार वाजता नवे कपडे घालून शिवतीर्थावर जागा सांभाळायची असे आम्ही कार्यकर्ते. बाळासाहेबांची आठवण घेतल्याशिवाय आमच्यासारखा शिवसैनिकांचा दिवस जात नाही. आणि ते संजय राऊत नावाचं मशिन म्हणतं सरकार काही करत नाही, अरे एक रुपयामध्ये पीकविमा मिळाला त्यामधला मी एक शेतकरी आहे. त्यासाठी 3312 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली. एक रुपयामध्ये शेतकऱ्यांचा विमा काढला. शेतकरी योजना केंद्र प्रमाणे नमो शेतकरी योजना आणली, एका क्लिकवर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये दिले.

- Advertisement -

अंगणवाडी सेविका, आशा वर्करांचे मानधन वाढवण्याची तरतूद केली तरी म्हणतात या सरकारने काहीच केलं नाही. संजय गांधी निराधाराचे हजारचे पंधराशे रुपये केले तरी म्हणतात एकनाथ शिंदे सरकारने काहीच केलं नाही. पाणीपुरवठा योजनामध्ये जल जीवन मिशनच्या अंतर्गत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमानाने 35 हजार गावांमध्ये पाण्याच्या योजना सुरू केल्या तरी म्हणतात की, शिंदे सरकारने काहीच केलं नाही, माझ्या माय बहिणीला एसटीमध्ये पन्नास टक्के सूट दिली. म्हातारा माणसाला शंभर टक्के मोफत प्रवास केला, तर ज्या पंढरपूरमध्ये सात आठ लाख लोक प्रवास करून दर्शन घ्यायचे तिथे 25 लाख लोकांनी दर्शन घेतले तरी म्हणतात की, शिंदे सरकारने काहीच केलं नाही. असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला देखी नही गोधडी और सपने मे आ गई खाट असे म्हणत टोला लगावला. मला तरी असं वाटतं की, मी बऱ्याच योजना शिंदे सरकारच्या सांगू शकतो. पण या मंत्रिमंडळातला सदस्य म्हणून खेड्यातला एक मंत्री म्हणून जे निर्णय सरकारने घेतले ते निर्णय थोडक्यामध्ये मांडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे.

हेही वाचा : भरपेट खाऊन, जाताना नवरा-बायकोत भांडण लावणारे भाजप नेते; ठाकरेंची फडणवीसांवर जहरी टीका

- Advertisement -

आरोप केले तरी करू द्या तुम्ही कामे सांगा

यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, आपल्यावर कितीही आरोप केले तरी तुमचे तोंड हे माईक झाले पाहिजे. सरकारने काय काम केली आहे हे जनतेपर्यंत तुम्ही सांगितले पाहिजे. मला तरी असं वाटतं सगळ्यात जास्त महाराष्ट्राचा दौरा करणारा मुख्यमंत्री या देशांमध्ये कोणी असेल तर त्याचं नाव आहे मुख्यमंत्री एकनाथ संभाजीराव शिंदे. तेव्हा इतिहास टकराने वालों का लिखा जाता है, संजय राऊत का नाही लिखा जाता. असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -