घरमहाराष्ट्रनागपूरWinter Session : देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणणारे...;दानवेंचा हल्ला...

Winter Session : देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणणारे…;दानवेंचा हल्ला तर फडणवीसांकडून…

Subscribe

राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांच्या गटाची घडी हातावर बांधत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन पोहचले. हाच मुद्दा हेरत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना लक्ष करत त्यांच्यावर हल्ला चढवला. दानवेंच्या टीकेला फडणवीस यांनीही जोरदार उत्तर दिले.

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. त्याला कारण आहे ते राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिकांच्या भूमिकेचे. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी शरद पवारांचा हात सोडत अजित पवारांच्या गटाची घड्याळ हातावर बांधत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन पोहचले. हाच मुद्दा हेरत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला चढवला. दानवेंच्या टीकेला फडणवीस यांनीही जोरदार उत्तर दिले. (Winter Session Those who say that one cannot sit on the lap of a traitor… Attack by demons and from Fadnavis…)

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (7 डिसेंबर) दुपारी 12 वाजता विधान परिषदेच्या कामकाजास सुरूवात झाली. यावेळी अंबादास दानवे यांनी सुरुवातीला शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या कृषी योजनेतील शेडनेटचा प्रश्न सभागृहात मांडला. ते म्हणाले की, शेतकरी सगळ्या शेतामध्ये शेडनेट उभारतात. परंतु ते शेडनेट वादळी वाऱ्यामध्ये उडून गेल्यानंतर त्याला विमा संरक्षण नाही. त्यामुळे शेडनेटला विमा संरक्षण देण्यात यावे, तर पशुधनालाही कोणतेही विमा संरक्षण नाही. त्यामुळे या दोन्ही बाबतीत विमा संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

यानंतर त्यांनी विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचे नाव न घेता त्यांच्या बदललेल्या भूमिकेवर भाष्य केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सातत्याने म्हणत होते की, एका देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसूच शकत नाही. अशा प्रकारची भूमिका सातत्याने घेतली गेली. असे म्हणत दानवे यांनी नवाब मलिकांविषयी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते याचा उल्लेख सभागृहात केला. तेव्हा याविषयी सरकारची भूमिका काय आहे याबाबत त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला. यावेळी सभागृहात काहीकाळ गोंधळ सुद्धा झाला होता.

हेही वाचा : MAHARASHTRA WINTER SESSION : विरोधकांच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी – अजित पवार

- Advertisement -

देवेंद्र फडणवीसांकडून दानवेंवर प्रतिहल्ला

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधी सौम्य तर नंतर आक्रमक शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेत्यांनी शेतकऱ्यांच्या शेडनेट बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर नक्कीच विचार केला जाईल आणि त्यासाठी याच अधिवेशनात ठोस उपाय योजना केल्या जातील.

हेही वाचा : Maharashtra Winter Session : हिवाळी अधिवेशन नागपुरातच का घेतले जाते? जाणून घ्या नागपूर कराराविषयी

आम्ही कोणच्याच मांडीला मांडी लावून बसलो नाही

अंबादास दानवेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला आश्चर्य वाटते की, ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असतानासुद्धा आम्ही त्यांना मंत्रीपदावर काढणार नाही अशी भूमिका घेतली होती. ते आता येथे भूमिका मांडतायेत. आम्ही येथे कोणाच्याच मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत. तर मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून अजित पवार बसले आहेत. दादांच्या मांडीला मांडी लावून छगन भुजबळ बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका, आधी तुम्हाला हे उत्तर द्यावे लागेल की, देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असतानाही तुम्ही त्यांना मंत्रीपदावरून का काढले नाही याचे उत्तर आधी द्या नंतर आम्हाला पश्न विचारा असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -