घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांनी देशद्रोही ठरवलेले Nawab Malik बसले सत्ताधाऱ्यांच्या बाकावर

देवेंद्र फडणवीसांनी देशद्रोही ठरवलेले Nawab Malik बसले सत्ताधाऱ्यांच्या बाकावर

Subscribe

आज नवाब मलिक यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसत त्यांचा पाठिंबा हा अजित पवार गटाला असल्याचे स्पष्ट केले आहे. विधिमंडळात जाण्याआधी नवाब मलिक हे अजित पवारांना भेटले. तर त्याआधी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली आहे. राज्यातील सर्व मंत्री या अधिवेशनासाठी नागपुरात कालच दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे देखील हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत. वैद्यकीय जामिनावर बाहेर आल्यावर नवाब हे शरद पवार गटात की अजित पवार गटात जाणार याबाबत मोठी चर्चा करण्यात येत होती. परंतु, आज मलिक यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसत त्यांचा पाठिंबा हा अजित पवार गटाला असल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभेत जाण्याआधी नवाब मलिक यांनी अजित पवार यांची भेट घेतली. तर त्याआधी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटले होते, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. (Devendra Fadnavis called Nawab Malik a traitor sat on the bench of the rulers)

हेही वाचा – Maharashtra Winter Session : हिवाळी अधिवेशन नागपुरातच का घेतले जाते? जाणून घ्या नागपूर कराराविषयी

- Advertisement -

कालपासूनच नवाब मलिक हे नेमके कोणाच्या गटात आहेत? असा प्रश्न निर्माण करण्यात येत होता. त्यानंतर आज सकाळी नवाब मलिक यांनी फोनवरून संवाद साधल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आली, तर त्यांची आज विधानभवनात दाखल होताच मलिक यांची माजी गृहमंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांच्यासोबत भेट झाली. एकमेकांच्या समोर आल्यावर या दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. ज्यामुळे ते शरद पवार गटातच असल्याची चर्चा करण्यात येत होती. मात्र, अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होताच ते सरकारी बाकावर बसलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे मलिक हे सत्तधारी बाकांवर सर्वात शेवटी बसले आहे. त्यामुळे आता मलिक अजित पवार गटात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवाब मलिक हे अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांच्या कार्यालयात जाऊन बसलेले पाहायला मिळाले. अनिल पाटील आणि धर्मराव बाबा अत्राम यांनी नवाब मलिक हे आमच्याच बाजूने आहेत असा विश्वास व्यक्त केला होता. जो आता सार्थकी ठरला आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. नवाब मलिक कोणाबरोबर आहेत याचा खुलासा नवाब मलिकच करतील. तसेच ते कोणाच्या बाजूने आहेत हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सांगतील. नवाब मलिक सभागृहात जाऊन बसतील, त्यानंतर सगळ समजेलच. राष्ट्रवादीचा मुख्य प्रतोद या नात्याने मी 23 नोव्हेंबर रोजी अर्ज दिला होता. विधानमंडळात आम्हाला कार्यालय दिले गेले आहे. अध्यक्षांनी ते कार्यालय दिले आहे, असे मत अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी व्यक्त केले होते. तर, नवाब मलिक आमच्यासह बसतील सकाळी 11 वाजता. नवाब मलिक आमच्याबरोबर येणे सकारात्मक आहे. नवाब मलिक आमच्या बरोबर आहेतच. माझी त्यांची भेट झालेली नाही पण ते आमच्यासह आहेत, असा विश्वास कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी व्यक्त केला होता. जो आता खरा ठरला आहे.

- Advertisement -

पण महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या देवेंद्र फडणवीसांनी दाऊदशी संबंध असलेल्या मलिकांना देशद्रोही असे म्हटले होते. तेच मलिक आता त्यांच्या सत्तेत सहभागी झाले आहेत? त्यामुळे आता फडणवीस याबाबत काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर विरोधकही या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना आणि विशेषतः फडणवीसांना प्रश्न विचारणार का? याबाबत आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर काही वर्षांपूर्वी म्हणजेच विरोधात असताना देवेंद्र फडणवीसांनी मलिकांवर टीका करत म्हटले होते की, डुकरासोबत कुस्ती करून घाण अंगाला लावून घ्यायची नाही, ज्यामुळे आता त्यावेळी फडणवीसांनी मलिकांवर केलेले आरोप खोटे होते, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -