घरताज्या घडामोडीWomens Day : देशातील हुकूमशहा संपवावा; उद्धव ठाकरेंचं महिलांना आवाहन

Womens Day : देशातील हुकूमशहा संपवावा; उद्धव ठाकरेंचं महिलांना आवाहन

Subscribe

'मी तमाम महिला शक्तीला आवाहन करतो की तुम्ही आता महिषासूरमर्दिनी बना आणि देशात जो हुकुमशहा माजू पाहतोय त्याचं मर्दन करा', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

आज जागतिक महिला दिन असून महिलांना शुभेच्छा देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ‘मी तमाम महिला शक्तीला आवाहन करतो की तुम्ही आता महिषासूरमर्दिनी बना आणि देशात जो हुकूमशहा माजू पाहतोय त्याचं मर्दन करा’, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. (women power should end dictator in country says uddhav thackeray)

उद्धव ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत असून धाराशिव दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. “महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावं हे कळत नाहीए. कारण कोणत्या देशात आपण राहतो इथली राजवट कशी आहे. महाराष्ट्रात काय सुरु आहे. मेरा परिवार असं मोदींनी जाहीर केलं. मग मणिपूरच्या महिला यात येत नाहीत का? तसेच आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटू यामध्ये येत नाहीत का? अशी महिलांची हालत बघितल्यानंतर त्यांना शुभेच्छा तरी कशा देऊ”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

“धाराशिवमध्ये येऊन काल मी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं त्या तुळजाभवानीचं तुम्ही रुप आहात. तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेला आसूर माजले त्यावेळी जगदंबेनं अवतार घेतले होते म्हणून आपण तिला महिषासूर मर्दिनी म्हणतो. म्हणून मी तमाम महिला शक्तीला आवाहन करतो की तुम्ही आता महिषासूरमर्दिनी बना आणि देशात जो हुकूमशहा माजू पाहतोय त्याचं मर्दन करुन पुन्हा एकदा भारत मातेचं रक्षण करण्यासाठी देशातील सर्व महिलांना आम्ही विनंती करतो, वंदन करतो आणि पुढच्या लढाईच्या यशासाठी आशीर्वाद मागतो. ही लढाई मोठी आहे कुठेही फसू नका? अडकू नका. विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय स्वस्थ बसू नका”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – पाच वर्ष जनतेला गॅसवर ठेवून निवडणुकीच्या काळात…, ठाकरेंची पंतप्रधानांवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -