घरमहाराष्ट्रपरमबीर सिंह यांना २१ मे पर्यंत अटक करणार नाही; राज्य सरकारची हायकोर्टाला...

परमबीर सिंह यांना २१ मे पर्यंत अटक करणार नाही; राज्य सरकारची हायकोर्टाला हमी

Subscribe

अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने २० मे पर्यंत परमबीर सिंह यांना अटक करणार नसल्याची हमी मुंबई उच्च न्यायालयाला दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या आरोपानंतर परमबीर सिंह यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात २८ एप्रिला अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी पार पडली. यावेळी राज्य सरकारने २० मे पर्यंत म्हणजेच पुढील सुनावणी होईपर्यंत अटक करणार नसल्याची ग्वाही दिली आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

परमबीर सिंह यांच्यावरील तीन आरोपांची गोपनीय चौकशी

परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होत आहे. एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तीन प्रकरणांची गोपनीय चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे, पोलीस निरीक्षक अनुप डांगे आणि बुकी सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.

परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांवर आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्रास देणे, धमक्या देणे या अंतर्गत तसंच अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातल्या कोतवाली पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, डीसीपी पराग मणेरे आणि आणखी काही अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्या सह ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायदा, भ्रष्ट्राचार आदी कलम लावण्यात आले आहेत. दरम्यान, अकोल्यातून गुन्हा दाखल करून तपासासाठी ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -