घरमहाराष्ट्रकामगारांनी स्थलांतर करु नये; कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

कामगारांनी स्थलांतर करु नये; कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

Subscribe

या संकट काळात राज्य सरकार कामगारांच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही देत मुश्रीफ यांनी कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहे. कामगारांनी स्थलांतर करु नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केले. या संकट काळात राज्य सरकार कामगारांच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. हसन मुश्रीफ यांनी आज कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद – सिंगल यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री मुश्रीफ यांचे स्वागत केले. त्यावेळी मुश्रीफ यांनी कामगारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतर न करण्याचे आवाहन केले.

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही ती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून संपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात सर्व दवाखान्यांद्वारे अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलबध करुन देण्यात आल्या असून कोणत्याही परिस्थितीत कोरोना अथवा इतर रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात अडचणी येणार नाहीत. तसेच या काळात कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कारखाने, उद्योग तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नाहीत याची संपूर्ण दक्षता आणि काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येत असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

- Advertisement -

कोणत्याही अफवांना बळी न पडता उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच स्वयंरोजगारीत असलेल्या सर्व कामगार आणि असंघटीत क्षेत्रातील कामगार यांनी आपापल्या क्षेत्रातील कारखाने, उद्योग यांमध्ये कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून कामकाज नियमित चालू राहील याबाबत निसंदेह रहावे. राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे व खाजगी वाहनांची वाहतूक व्यवस्था कोरोन प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून सुरळीतपणे चालू राहणार आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही भिती न बाळगता सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था देखील होणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. प्रत्येक कामगाराने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेताना आपापले उद्योगधंदे नियमितपणे चालविण्यासाठी संपूर्ण हातभार लावावा, असे आवाहनही हसन मुश्रीफ यांनी केले.


हे वाचा- कोरोनाविरोधातील निर्बंध व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही – मुख्यमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -