घरमहाराष्ट्रवर्षातील अखेरची अंगारकी संकष्ट चतुर्थी!

वर्षातील अखेरची अंगारकी संकष्ट चतुर्थी!

Subscribe

यंदाच्या वर्षातील उद्या, मंगळवारी शेवटची अंगारकी संकष्ट चतुर्थी असून मुंबईत रात्री ९.०३ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.

यंदाच्या वर्षातील उद्या, मंगळवारी शेवटची अंगारकी संकष्ट चतुर्थी असून मुंबईत रात्री ९.०३ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. संकट चतुर्थी ही मंगळवारी आल्यास त्याला अंगारकी म्हटलं जात. या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. त्यानिमित्ताने मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि राज्यातील इतर गणरायाच्या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे अशा मोठ्या मंदिरांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षेची व्यवस्था तैनात केली जाते. शिवाय प्रत्येक भाविकाला बाप्पाचे दर्शन मिळावे याची व्यवस्थाही मंदिरातील व्यवस्थापन मंडळी पाहतात. या दिवशी भाविक उपवास करतात, तर रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. यावेळी बाप्पाचे आवडते खाद्य ११ किंवा २१ मोदकाचे नैवेद्य चंद्राला दाखवले जाते. त्यानंतर भोजन ग्रहण केले जाते. अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

या मंत्राचा जप करतात 

गजाननं भूत गणादि सेवितं, कपित्थ जम्बू फल चारू भक्षणम्।
उमासुतं शोक विनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम्।।

- Advertisement -

यंदाच्या वर्षातील तिसरी अंगारकी 

२०१८ साली तिनदा अंगारकी संकष्ट चतुर्थीचा योग आला आहे. यापूर्वी ३ एप्रिल आणि ३१ जुलै रोजी अंगारकी चतुर्थी होती. त्यामुळे २५ डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा अंगारकीचा योग आला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये २०१८ हे साल संपणार असून नवीन वर्षाचे, २०१९ चे आगमन होणार आहे. त्याआधी अंगारकी आल्यामुळे सर्व गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, २५ डिसेंबर रोजी नाताळ सण असल्यामुळे सार्वजनिक सुट्टीदेखील आहे. तेव्हा भाविकांना सुट्टी असल्यामुळे मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.

वाचा : नव्या वर्षात सण उत्सव ११ दिवस आधीच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -