घरमहाराष्ट्रआमदार गायब होण्यामागे जिल्हा परिषद कनेक्शन

आमदार गायब होण्यामागे जिल्हा परिषद कनेक्शन

Subscribe

आठवडाभरापासून सुरू असलेल्या घडामोडींमध्ये मिनी मंत्रालयात हा कट शिजला असल्याचे समोर येत आहे.

राज्याच्या सत्ता नाट्यात अजित पवार यांच्या वळचणीला गेलेले जिल्ह्यातील ४ आमदारांपैकी २ आमदार हे जिल्हा परिषद सदस्यांच्या सांगण्यावरुन गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या घडामोडींमध्ये मिनी मंत्रालयात हा कट शिजला असल्याचे समोर येत आहे. यात एका कर्मचार्‍यांचा थेट संबंध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

जिल्हा परिषदेतील सदस्यांचाही सहभाग

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १५ पैकी सर्वाधिक ६ जागा जिंकत नाशिकने पुन्हा एकदा शरद पवार यांना पाठबळ दिले होते. शनिवारी (दि.२३) महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडून आली आणि राजभवनात झालेल्या सत्तासंपादनाच्या नाट्याचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार माणिक कोकाटे (सिन्नर), दिलीप बनकर (निफाड) व नरहरी झिरवाळ (दिंडोरी) हे स्वत: साक्षीदार बनल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. यानंतर कळवणचे आमदार पवार व दिंडोरीचे झिरवाळ हे संपर्क क्षेत्राबाहेर गेले होते. त्यांना दिल्लीला रवाना करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, रविवारी हे दोन्ही आमदारांनी पक्षासोबत असल्याचे सांगत, राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले. मात्र, या राजकीय घडामोडी दोन दिवसापूर्वीपासूनच सुरू होत्या. यातही जिल्हा परिषदेतील काही सदस्यांचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. सदर सदस्य हे घडामोडीचे साक्षीदारच असल्याची चर्चा आहे. यातही एक कर्मचारी हा थेट या प्रक्रियेत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -