घरमुंबईमहावितरण ग्राहकांकरता खुशखबर

महावितरण ग्राहकांकरता खुशखबर

Subscribe

आता 'गो-ग्रीन' वीजबील भरण्याच्या सुविधेवरुन बिल भरल्यास तुम्हाला मिळणार महावितरणकडून १० रुपयांची सवलत.

महावितरण ग्राहकांकरता एक आनंदाची बातमी आहे. आता महावितरण ग्राहकांना महावितरणकडून १० रुपयांची सवलत मिळणार आहे. ग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहित करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल आणि एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या १ डिसेंबर पासून प्रतिबील १० रुपये सवलत दिली जाणार आहे. ‘गो-ग्रीन’ वीजबील भरण्याच्या सुविधेवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

येथे करा गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती आणि वीजबील भरण्यासाठी मोबाईल ॲप आणि www.mahadiscom.in यावर ऑनलाईनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतु जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल आणि एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध करून दिले जाते. या सर्व ग्राहकांना १ डिसेंबर पासून प्रतिबील १० रुपये सवलत मिळणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर https:illing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन केल्यास त्यांना या लाभ घेता येणार आहे.

- Advertisement -

गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे. तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा.  – संजीव कुमार, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -