घरदेश-विदेशकाय म्हणताय? एफडीवर जास्त व्याज !!

काय म्हणताय? एफडीवर जास्त व्याज !!

Subscribe

SBIच्या एफडीवर ६.८० टक्के व्याज मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे व्याजदर तात्काळ लागू करण्यात आले आहेत. 

आम्ही कर्ज घेतलं तर त्यावर जास्त व्याज आणि बँकेमध्ये आम्ही पैसे एफडी करून ठेवले तर कमी व्याज असे एक ना अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडतात. किंवा चांगला परतावा मिळावा म्हणून आपण अनेकवेळा बँकेत एफडीकरून पैसे ठेवतो. पण, त्यावर मिळणाऱ्या व्याजावर आपण बऱ्याचदा असमाधानी असतो. पण आता काहीही काळजी करायची किंवा नाराज होण्याची गरज नाही. कारण, एफडीवर मिळणाऱ्या व्याज दरामध्ये आता वाढ झाली आहे. एसबीआयनं एफडीवरील व्याज दरामध्ये वाढ केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने  फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजदरात पाच बेसिक पॉइंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे आता एफडीवर ६.८० टक्के व्याज मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे व्याजदर तात्काळ लागू करण्यात आले आहेत. एकाच वर्षात दोन वेळा व्याजदर वाढवल्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच वरिष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दरवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ६.७५ टक्के व्याजदर मिळत होता. त्यामध्ये आता पाच पॉईंटनं वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -