घरमहाराष्ट्रअन्न व औषध प्रशासनातर्फे ८ हॉटेल्सचे परवाने ठराविक काळासाठी रद्द

अन्न व औषध प्रशासनातर्फे ८ हॉटेल्सचे परवाने ठराविक काळासाठी रद्द

Subscribe

अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी नाशिकच्या ८ हॉटेल्सचे परवाने ठराविक काळासाठी रद्द केले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. ए. चौगुले यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी विविध ठिकाणच्या हॉटेल व्यवसायिकांच्या तपासण्या एप्रिल ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत केल्या होत्या. तपासणी वेळी स्वच्छतेबाबत, कागदपत्राबाबत व अन्य त्रुटी आढळून आल्या होत्या. त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधितांना पुरेसा कालावधी देवूनही त्यांनी पूर्तता केली नसल्याने संबंधित ८ हॉटेल्सचे परवाने ठराविक काळासाठी रद्द करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. ए. चौगुले यांनी दिली.

… अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई

सहाय्यक आयुक्त (अन्न) एस. ए. चौगुले म्हणाले की, ‘हॉटेलमधील अस्वच्छतेमुळे ग्राहकांना स्वच्छ, निर्भेळ आणि सकस अन्नपदार्थ मिळण्यास अडचण होते. म्हणून अशा हॉटेलांचे परवाने ग्राहकांच्या आरोग्याच्या हितासाठी ठराविक काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. हॉटेल व्यवसायिकांनी परवाना रद्दच्या काळात व्यवसाय बंद ठेवावा. तसेच या काळात व्यवसाय सुरू ठेवल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होवू शकते.

परवाना रद्द केलेल्या पेढीचे नाव आणि कालावधी

  • हॉटेल पर्ल स्टेट बँकेजवळ विजयनगर, सांगली (१५ ते २४ डिसेंबर २०१८)
  • हॉटेल शिवप्रेमी, खानापूर बस स्टँड समोर, खानापूर (१७ ते १८ डिसेंबर २०१८)
  • हॉटेल नीलसागर बिअर बार व परमिट रूम, कराड रोड, विटा, ता. खानापूर (१७ ते १८ डिसेंबर २०१८)
  • हॉटेल ऐश्वर्या, वझीर मेशन, खानापूर रोडा, विटा, ता. खानापूर (१७ ते १८ डिसेंबर २०१८)
  • हॉटेल डायमंड, श्रीराम नगर मायणी रोड, विटा, ता. खानापूर (१८ ते २१ डिसेंबर २०१८)
  • हॉटेल वूड हाउस, गुलमोहर कॉलनी, दक्षिण शिवाजीनगर, सांगली (२८ डिसेंबर २०१८ ते ६ जानेवारी २०१९)
  • मे महालक्ष्मी स्वीट मार्ट, ३०६८/३०६९, मु. पो. कवठेमहांकाळ, सांगली (१५ डिसेंबर २०१८)
  • हॉटेल न्यू अथर्व गार्डन, मिरज पंढरपूर हायवे, शिरढोण, ता. कवठेमहांकाळ, सांगली (१० डिसेंबर २०१८)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -