घरमुंबई'प.रे.' वर ११ तास मेगाब्लॉक, जादा बसेस धावणार

‘प.रे.’ वर ११ तास मेगाब्लॉक, जादा बसेस धावणार

Subscribe

मेगाब्लॉकच्या या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी या मार्गावर बेस्टकडून विशेष बस चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते दादर या स्थानंकांदरम्यान तब्बल ११ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी हे नियोजन करण्यात आले असून, आज रात्री १० वाजल्यापासून ते उद्या म्हणजेच रविवारी (३ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. २ फेब्रुवारीच्या मेगाब्लॉक दरम्यान लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्याचे काम करण्यात येणार आहे. ४० टन वजनी दोन क्रेनच्या मदतीने या दिवशी उड्डाणपुलाला नवे गर्डर टाकण्यात येतील. याच कामासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस मिळून ११ तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यादरम्यान, लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही. तर अंधेरी, विरार, वसई, भाईंदर आणि बोरिवलीहून सुटणाऱ्या लोकल प्रभादेवी स्थानकापर्यंत चालवण्यात येतील.

लोकलच्या वेळापत्रकासोबतच या मार्गावरुन धावणाऱ्या काही मेल गाड्या तसेच एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. लोअर परळ स्थानकाजवळ असलेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेला डिलाईल पूल पूर्णत: गंजल्याचे चित्र दिसत आहेत. त्यामुळे हा पूल तोडून दुरस्तीचे काम पश्चिम रेल्वेकडून केले जात आहे.

- Advertisement -

प्रवाशांच्या सोयीसाठी ‘बेस्ट’ची मदत

दरम्यान, मेगाब्लॉकच्या या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी या मार्गावर बेस्टकडून विशेष बस चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी बॅकबे आणि वरळी डेपोतून प्रत्येकी तीन-तीन अशा सहा विशेष बसगाडया सोडल्या जाणार असल्याची माहिती, बेस्टचे प्रवक्ते बी.ए.झोडगे यांनी ही माहिती दिली आहे. या सर्व जादा बसेस चर्चगेट ते दादर स्थानकादरम्यान धावणार असून, मरीन लाईन्स- चर्नीरोड- मुंबई सेंट्रल- महालक्ष्मी- लोअर परेल आणि प्रभादेवी अशा सर्व स्थानकांवर थांबा घेतील.शनिवारी रात्री ९.३० ते रात्री १.३० आणि त्यानंतर पहाटे ३.३० ते सकाळी १० वाजेपर्यंत या बसेस धावतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -