घरमुंबईसनदी अधिकार्‍यांच्या यशोधन इमारतीत २६ करोना बाधित

सनदी अधिकार्‍यांच्या यशोधन इमारतीत २६ करोना बाधित

Subscribe

चर्चगेट परिसरात असलेल्या सनदी अधिकार्‍यांच्या यशोधन या इमारतीमध्ये तब्बल २६ करोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे मुंबईच्या प्रशासकीय वर्गामध्ये एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच मुंबई महानगर पालिकेमध्ये करोनाविरोधी टीमची जबाबदारी असलेल्या एक महिला अधिकारी देखील करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. आत्तापर्यंत प्रधान सचिव दर्जाचे ४ अधिकारी आणि ८ आयपीएस अधिकार्‍यांना करोनाची लागण झाल्यामुळे प्रशासकीय वर्गामध्ये देखील आता चिंतेचे वातावरण पसरू लागले आहे.

९० पैकी २६ करोना पॉझिटिव्ह!
‘यशोधन’मध्ये मुंबईतल्या विविध विभागांमध्ये, मंत्रालयात आणि महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांमध्ये काम करत असलेले सनदी अधिकारी राहतात. नुकतीच याच इमारतीत राहणारे वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय मुखर्जी यांच्या चालकाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे इथल्या सर्व अधिकार्‍यांच्या चालक, कर्मचार्‍यांची करोना तपासणी करण्यात आली. त्यात चाचणी केलेल्या एकूण ९० जणांपैकी २६ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे ‘यशोधन’मध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे करोनाच्या या लॉकडाऊन काळात देखील द्या सनदी अधिकार्‍यांमार्फत काही प्रमाणात राज्यातले सरकारी व्यवहार सुरू आहेत, त्याच अधिकार्‍यांच्या दाराशी करोना आता पोहोचला आहे. एकूण सापडलेल्या २६ करोनाबाधितांपैकी ८ जण हे त्या इमारतीत राहात होते, तर इतर २० जण बाहेरून येत होते. यामध्ये मुंबईतील कोविड १९ विरोधातील टास्क फोर्सची जबाबदारी असलेल्या आयएएस अधिकार्‍यासोबत इतर अधिकार्‍यांचे ३ चालक, सार्वजनिक बांधकाम विभागातले २ अधिकारी आणि इतर घरकामगार आहेत.

- Advertisement -

यशोधन अनेक बड्या अधिकार्‍यांचे निवासस्थान
यशोधनमध्ये एकूण ४२ वरीष्ठ सनदी अधिकारी राहातात. यामध्ये गृह खात्याचे सचिव संजय कुमार, आरोग्य खात्याचे सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी, मुख्यंमत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आणि त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या एव्हिएशन सेक्रेटरी वळसा नायर-सिंह, प्रधान सचिव भूषण गगराणी, महिला व बालकल्याण सचिव आय कुंदन, त्यांचे आयपीएस पती निकेत कौशिक, राज्याच्या गुप्तहेर खात्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला अशा अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -