Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी दहिसर येथे आज ३ घरांची पडझड, एकाचा मृत्यू

दहिसर येथे आज ३ घरांची पडझड, एकाचा मृत्यू

दुर्घटनेत ७ -८ जणांना स्थानिक नागरिकांनी वाचवले

Related Story

- Advertisement -

मालाड, मालवणी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास घराच्या पडझडीत ११ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाल्याची दुर्घटना ताजी असतानाच गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दहिसर ( पूर्व) येथील शंकर मंदिरटेकडीजवळील चाळीतील तीन घरांची पडझड होऊन त्यामध्ये प्रद्युम्न सरोज (२६) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.(3 houses collapsed today In Dahisar, One person killed )   तर या दुर्घटनेत ७ -८ जणांना स्थानिक नागरिकांनी वाचवले. यासंदर्भातील माहिती शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक बालकृष्ण ब्रीद यांनी दिली आहे.


दहिसर (पूर्व), शिवाजी नगर, शंकरमंदिर टेकडीच्या बाजूला, लोखंडी चाळ याठिकाणी असलेल्या बैठ्या चाळीतील तीन घरांची गुरुवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास पडझड झाली. घरे पडल्याची दुर्घटना घडताच आजूबाजूच्या रहिवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य करीत ७ – ८ नागरिकांना वाचवले. सदर घरे ही अंदाजे ४० वर्षांपूर्वीची असून त्यात काही कुटुंबे राहत होती, असे नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी सांगितले.


- Advertisement -

हेही वाचा – मालाड मालवणी येथे घर कोसळून ८ मुलांसह ११ जण मृत ; ७ जण जखमी

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -