Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा ENG vs NZ : पदार्पणात पहिलाच चेंडू नो-बॉल टाकणारा गोलंदाज आता इंग्लंडकडून...

ENG vs NZ : पदार्पणात पहिलाच चेंडू नो-बॉल टाकणारा गोलंदाज आता इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी खेळणारा खेळाडू

इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामन्यांचा विक्रम याआधी माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकच्या नावे होता.

Related Story

- Advertisement -

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. एजबॅस्टन येथे होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी इंग्लंडने संघात केवळ एक बदल करत वेगवान गोलंदाज ऑली स्टोनला संधी दिली. त्यांनी अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला विश्रांती देणे टाळले. अँडरसनसाठी हा सामना खूप खास ठरला असून त्याने इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामन्यांचा विक्रम आता आपल्या नावे केला आहे. इंग्लंडसाठी अँडरसनचा हा १६२ वा कसोटी सामना आहे.

अ‍ॅलिस्टर कुकला टाकले मागे

इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामन्यांचा विक्रम याआधी माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकच्या नावे होता. कुकने १६१ कसोटी सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु, आता त्याला अँडरसनने मागे टाकले आहे. अँडरसन हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. कसोटीत ६०० हून अधिक विकेट घेणारा तो एकमेव वेगवान गोलंदाज आहे. अँडरसनने आतापर्यंत ६१६ विकेट घेतल्या आहेत.

पहिलाच चेंडू नो-बॉल टाकला

- Advertisement -

इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामन्यांचा विक्रम आता अँडरसनच्या नावे झाला असला, तरी त्याला पदार्पणाच्या वेळी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्याबाबत फारसा विश्वास नव्हता. त्याने मे २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्यावेळची आठवण सांगताना अँडरसन म्हणाला, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेन असे मला वाटले नव्हते. त्यावेळी नासिर हुसेन इंग्लंडचा कर्णधार होता आणि त्याने मी गोलंदाजी करत असताना फाईन लेग ठेवला नव्हता. मी बऱ्याच धावा खर्ची केल्या होत्या. पहिलाच चेंडू मी नो-बॉल टाकला होता. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्याबाबत फारसा विश्वास नव्हता.

- Advertisement -