घरमुंबईमहिलांच्या सोईसाठी तेजस्विनी येतेय

महिलांच्या सोईसाठी तेजस्विनी येतेय

Subscribe

धारावी डेपोत दाखल

शहरातील महिला प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढते आहे. महिलांच्या वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी आता बेस्टच्या ताफ्यात ३ मिनी तेजस्विनी बसेस दाखल झाल्या आहेत. धारावी डेपोमध्ये या बसेस उभ्या केल्या असून लवकरच त्या महिलांसाठी मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर अत्याधुनिक महिला प्रवाशांसाठी ‘उत्तम’ लोकल सुरू केली आहे. या लोकलच्या दररोज 10 फेर्‍या होणार असून संध्याकाळी 6.15 वाजता चर्चगेट ते विरार या रेल्वे मार्गावर धावणार आहे.

सध्या नवी मुंबईमध्ये खास महिलांसाठी चालविण्यात येणार्‍या तेजस्विनी बसेस रस्त्यावर धावत आहेत. महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी महिला स्पेशल ट्रेन ,बसेस चालविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून बेस्ट प्रशासनाने महिलांसाठी स्पेशल अशा ३७ नॉन एसी डिझेलवर धावणार्‍या मिनी बसेस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने जुलै महिन्यात मंजुरी दिलेली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारच्या ‘तेजस्विनी’ बस योजनेनुसार शहरात गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांच्या फायद्यासाठी अशा मिनी बसेस चालविण्याची योजना आहे. तेजस्विनी बसेसकरिता बेस्ट उपक्रमाला ११कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळालेला आहे. त्यातून पहिल्या टप्यातील ३ बसेस खरेदी करण्यात आलेल्या आहेत. एका बसची किंमत सुमारे २९ लाख ५० हजार इतकी आहे.या बसेस सध्या धारावी डेपोमध्ये उभ्या केलेल्या आहेत. त्या लवकर महिलांसाठी रस्त्यावर येतील अशी माहिती बेस्टमधील एका अधिकार्‍याने दिली.

महिलांसाठी विशेष ‘उत्तम’ लोकल

- Advertisement -

पश्चिम रेल्वेवर महिला प्रवाशांसाठी ‘उत्तम’ रेक सुरू केली आहे. या लोकलच्या दररोज 10 फेर्‍या होणार असून संध्याकाळी 6.15 वाजता चर्चगेट ते विरार या रेल्वे मार्गावर धावणार आहे. पश्चिम रेल्वेच्या 69 व्या स्थापना दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयींसाठी पश्चिम रेल्वेने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या दिवसाचे निमित्त साधून चर्चगेट ते विरार मार्गावर महिलांसाठी उत्तम रेक असणारी लोकल सुरू करण्यात आली आहे. ही लोकल चर्चगेटहून संध्याकाळी 6.15 वाजता सुटेल तर विरारला रात्री 7.57 वाजता पोहचेल. या लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन बदल करण्यात आलेले आहेत. त्यासाठी सामानाकरिता जादा जागा, अधिक चांगली आसनव्यवस्था आणि डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेल्या आहेत. प्रथम श्रेणीच्या डब्यातील आसनव्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. डब्याला निळ्या रंगाऐवजी ब्राऊन रंग देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -