घरमुंबईअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Subscribe

बोगस डॉक्टरला अटक, मेडिकल चालक फरार

कल्याण पूर्वेत क्लिनिकमध्ये काम करणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर डॉक्टर आणि मेडिकल चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी डॉ. ताज अन्सारी याला बेड्या ठोकल्या असून मेडिकल चालक दिलदार शेख हा फरार झाला आहे. ताज हा बोगस डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण पूर्वेकडील नेतिवली परिसरात डॉ. ताज अन्सारी याचे हसन क्लिनिक सेंटर आहे. त्याच्या क्लिनिकच्या शेजाारी दिलदार शेख याचे मेडिकल आहे. ताज अन्सारी याच्या हसन क्लिनिक सेंटरमध्ये अल्पवयीन मुलगी काम करत होती. त्या मुलीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा फायदा घेत ताज अन्सारी तिच्याशी अनेकदा लगट करण्याचा प्रयत्न करायचा. मात्र तो आपल्याला कामावरून काढून टाकेल, या भीतीने ती मुलगी त्रास सहन करत होती. त्यामुळे अन्सारीची हिंमत वाढत जाऊन तो अत्याचार करत राहिला.

- Advertisement -

तिच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत त्याने काही महिन्यांपूर्वी तिच्यावर क्लिनिकमध्ये लैंगिक अत्याचार केला. या घटनेची कुठे वाच्यता केल्यास कामावरून काढून टाकेन आणि तुझी बदनामी करेन, अशी धमकी त्याने तिला दिली होती. त्यानंतर तो तिच्यावर लैगिक अत्याचार करत होता. हा प्रकार मेडिकल चालक दिलदार शेख याला समजताच. त्याने डॉक्टर आणि त्या मुलीचा व्हिडिओ तयार केला. तिला हा व्हिडिओ दाखवून बदनामी करण्याची धमकी देत त्यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

या प्रकारामुळे ती मुलगी खूपच भयभीत झाली होती. सातत्याने होणार्‍या त्रासाला कंटाळून तिने या प्रकाराची आपल्या कुटुंबाला माहिती दिली. कुटुंंबाच्या मदतीने थेट कोलशेवाडी पोलीस ठाणे गाठून या दोघांच्याही दुष्कृत्याचा पाढा तिने वाचला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी ताज अन्सारी आणि दिलदार शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -