घरमुंबईडोंगरीतून ५ लाख किमतीचे तेलसाठा जप्त; एफडीएची १० दिवसांत दुसरी कारवाई

डोंगरीतून ५ लाख किमतीचे तेलसाठा जप्त; एफडीएची १० दिवसांत दुसरी कारवाई

Subscribe

नळ बाजारात असलेल्या हसंराज खिमराज अ‍ॅण्ड कंपनी या तेल कंपनीवर शुक्रवारी उशीरा एफडीएने छापा घातला. यामध्ये तब्बल २५०३ किलो वजनाचे ४ लाख ८१ लाख किमतीचे तेल जप्त केले.

दुय्यम दर्जाच्या तेलाची साठवणूक, वापरलेल्या तेलाचा पुर्नवापर, अस्वच्छ ठिकाणी तेलाची करण्यात येत असलेली साठवणूक या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील तेलाच्या दुकानांवर कारवाईचा धडाका लावला आहे. डोंगरी भागातील नळ बाजारात असलेल्या हसंराज खिमराज अ‍ॅण्ड कंपनी या तेल कंपनीवर शुक्रवारी उशीरा एफडीएने छापा घातला. यामध्ये तब्बल २५०३ किलो वजनाचे ४ लाख ८१ लाख किमतीचे तेल जप्त केले.

नळ बाजारातील हसंराज खिमराज अ‍ॅण्ड कंपनी या तेल कंपनीत दुय्यम दर्जाच्या तेलाबरोबरच अस्वच्छ पद्धतीने तेलाचा साठा करण्यात येत असल्याची माहिती एफडीएच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यानुसार एफडीएच्या आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त श्रीकांत केंकरे, अन्न सुरक्षा अधिकारी जी.एम.कदम, वाय. एस. कणसे, पी.पी. पवार यांनी ४ डिसेंबरला कारवाई केली. हसंराज खिमराज अ‍ॅण्ड कंपनीमध्ये तेलाचा दर्जा तपासण्यासाठी आवश्यक असलेली प्रयोगशाळाच नसल्याचे यावेळी उघडकीस आले. या कारवाईमध्ये पामतेलाचे एक टँक, रिफाईन पामोलिन तेलाचा पुनर्वापर केलेले डब्बे, पामोलिन तेलाचे दोन टँक, रिफाईंड सनफ्लॉवर तेल, शेंगदाणे तेल असे तब्बल २५०३.१५ किलोग्रॅम वजनाचे तेल जप्त केले. या तेलाचे बाजारमूल्य ४ लाख ८१ हजार ११८ रुपये इतके आहे. जप्त केलेल्या पाचही प्रकारच्या तेलाचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

दिवाळीमध्ये एफडीएने राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. त्यापाठोपाठ आता अशुद्ध तेलाचा वापर करणार्‍या आणि वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करणार्‍यांविरोधात एफडीएने धाडसत्र सुरू केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -