घरमनोरंजनकिंग मिका सिंह कंगनावर भडकला, म्हणाला पुत्तर इस तरफ मत आओ

किंग मिका सिंह कंगनावर भडकला, म्हणाला पुत्तर इस तरफ मत आओ

Subscribe

बॉलिवुड सेलिब्रिटी कंगना रनौतने शेतकरी आंदोलनावरून ट्विट केल्यानंतर तिच्या अडचणी कमी होण्याचे नाव नाही. याआधी मुंबई पोलिसांची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत करत कंगनाने सगळ्यांचा रोष ओढावून घेतला होता. त्यातच आता एका आजीला ट्विटरवरून सुनावल्यामुळे कंगनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. कंगना ट्विटरच्या माध्यमातून केवळ विखारी वक्तव्य करत असल्याची टिकाही अनेक सेलिब्रिटींमार्फत करण्यात येत आहे. याआधीच स्वरा भास्कर आणि तापसी पन्नूने कंगनाच्या विखारी ट्विटवर समाजात विष पसरवत असल्याचा आरोप केला होता. तसेच कंगनाचे ट्विट्स हे अजेंड्याने प्रेरित असतात असा दावा या सेलिब्रिटींनी केला होता. या सगळ्या वादात आता वादग्रस्त गायक म्हणून असलेल्या मिका सिंहनेही उडी घेतली आहे.

- Advertisement -

मिका सिंहने सर्व पंजाबी बांधवांना आवाहन केले आहे की, बांधवानो सगळ्यांनी थोड शांत व्हा. आपण इथे कंगना रनौतवर फोकस करण्यासाठी जमलेलो नाही. माझे कोणतेही वैयक्तिक वादही कंगनासोबत नाहीत. पण कंगनाने केलेल्या चुकीबद्दलच तिला या सगळ्या प्रतिक्रियांना सामोरे जावे लागत आहे. तिने आपले ट्विट डिलिट केल्यानंतरही साधी माफी मागितली नाही असे ट्विट मिका सिंहने केले आहे. कंगनाने केलेल्या चुकीचा परिणाम तिने भोगला आहे. पण आता मिका सिंहचे हेच ट्विट्स सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मिका सिंह यांचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, एक प्रकारे मिका सिंहने कंगनाला इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे. या संपुर्ण प्रकरणात कंगनासाठीच्या अडचणी आणखी वाढतील असेच काहीसे संकेत मिका सिंहने दिले असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

 

- Advertisement -

कंगना मुर्ख आहे

शेतकऱ्यांना पाठिंबा देणे हे आपल्या सर्वांचे उदिष्ट असायला हवे, कंगना मुर्ख आहे, त्यामुळे तिला तिच आयुष्य जगू द्या असे मिका सिंहने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. कंगनाने सॉफ्ट टार्गेट असलेल्या करण जोहर, रणबीर कपुर, ऋतिक रोशन यासारख्या सेलिब्रिटींना लक्ष्य करावे. पण तु आमच्याकडे वळू नको अशा शब्दातच मिका सिंहने कडक दम भरला आहे. सॉफ्ट सेलिब्रिटींना टार्गेट करतेस तोवर ठिक आहे, तिथे तू वाचलीस, पण आमच्याकडे तु चुकुनही बोलू नकोस अशा शब्दातच मिका सिंहने दम भरला आहे.

 


कंगना तु माफी माग…

कंगना, मला तुझ्याविषयी कमालीचा आदर होता, जेव्हा तुझ्या कार्यालयावर कारवाई झाली तेव्हाही मी तुला सपोर्ट केला होता. पण मी चुकलो, कंगना तु महिला असताना तुला दुसऱ्या वृद्ध महिलेसाठी आदर द्यावासा वाटत नाही. तुझ्यात जराही सभ्यता असेल, तर तु माफी माग. अशा शब्दात मिका सिंहने नाराजी व्यक्त केली आहे.


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -