घरमुंबईहरवलेल्या ५ वर्षीय मुलीला अर्ध्या तासात शोधले; महिला पोलिसांचे कौतुक

हरवलेल्या ५ वर्षीय मुलीला अर्ध्या तासात शोधले; महिला पोलिसांचे कौतुक

Subscribe

पोलिसांनी निधीला तिच्या ताब्यात दिले. आईला पाहताच निधी धावत जाऊन तिच्या कुशीत विसावली. हे दृश्य पाहून उपस्थित साऱ्यांचेच मन हेलावले होते.

गर्दीमुळे आईचा हात सुटल्याने ५ वर्षीय लहानगीची आणि तिच्या आईची ताटातूट झाली. महिला पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या अर्ध्या तासात मुलीची आणि आईची भेट घडवून आणण्यात महिला पोलिसांना यश आले. महिला पोलिसांच्या सतर्क कामगिरीचे कौतुक होत आहे. पोलिसांनी निधीला तिच्या ताब्यात दिले. आईला पाहताच निधी धावत जाऊन तिच्या कुशीत विसावली. हे दृश्य पाहून उपस्थित साऱ्यांचेच मन हेलावले होते.

हेही वाचा – भिवंडीत आदिवासी विकास महामंडळाचा धान भरडाई घोटाळा

अशी सापडली हरवलेली निधी

डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या सोनल एकावटे या शुक्रवारी सकाळी त्यांची मुलगी निधी हिला शाळेतून घरी घेऊन जात होत्या. गर्दीतून जाताना आईचा हात सुटल्यामुळे निधी बेपत्ता झाली. सोनल यांनी राकेश करलकर या रिक्षा चालकाच्या मदतीने निधीचा सर्वत्र शोध सुरू केला. मात्र मुलीचा कुठेही थांगपत्ता न लागल्याने सोनल यांना रडू कोसळले. त्याच दरम्यान बेपत्ता झालेली निधी गर्दीतून रस्त्याने एकटीच रडत रडत चालली होती. महिला पोलीस शिवगंगा शिरसाठ आणि दिशा महाले यांनी या बालिकेची अवस्था पाहून तिला पोलीस ठाण्यात आणले. महिला पोलिसांनी रडणाऱ्या बालिकेला धीर देऊन समजूत काढली. त्यानंतर बिट मार्शल आणि वायरलेस यंत्रणेमार्फत बालिकेच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. त्याच दरम्यान निधीची आई सोनल या देखील पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. पोलिसांनी निधीला तिच्या ताब्यात दिले. आईला पाहताच निधी धावत जाऊन तिच्या कुशीत विसावली. हे दृश्य पाहून उपस्थित साऱ्यांचेच मन हेलावले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -