घरमनोरंजनपंतप्रधान मोदींना पत्र लिहीणाऱ्या 'त्या' कलाकारांवर गुन्हा दाखल

पंतप्रधान मोदींना पत्र लिहीणाऱ्या ‘त्या’ कलाकारांवर गुन्हा दाखल

Subscribe

या पत्रातील त्या ४९ कलाकारांमध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप, केतन मेहता, श्याम बेनेगल, रामचंद्र गुहा, शुभा मुद्गल, अपर्णा सेन आणि कोंकणा सेन शर्मा यासारख्या बॉलिवूड कलाकारांनी यावर सह्या केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार एकत्र आले आणि त्यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना मॉब लिचींगवर कारवाई करावी या संदर्भात पत्र लिहीले होते. त्यावेळी हे कलाकार मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. देशात मॉब लिंचिंगच्या घडामोडींमुळे बिघडत असणाऱ्या वातावरणाविषयी थेट पंतप्रधानांनाच एक पत्र लिहिलं होतं. आता हेच प्रकरण या कलाकारांना भोवणार असं दिसतय. या प्रकरणी त्या कलाकारांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एकणू ४९ जाणांनी देशातील ढासळत असलेल्या वातावरणाबाबत मोदींना पत्र लिहीलं होतं. या पत्रामुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप आता या ४९ कलाकारांवर करण्यात आला आहे.

मुझफ्फरपूर जिल्हा पोलिस ठाण्यात या कलाकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच ही कारवाई करण्यात आली. वकील सुधीर ओझा यांनी गेल्या वर्षी या कलाकारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.
पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून देशातील असहिष्णुता आणि सर्रासपणे होत असलेला हिंसाचार निदर्शनास आणून दिला होता. यावर वकील सुधीर ओझा यांनी एका षडयंत्रांतर्गत परदेशात देशाची बदनामी केल्याचा आरोप करत न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

- Advertisement -

या पत्रातील त्या ४९ कलाकारांमध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप, केतन मेहता, श्याम बेनेगल, रामचंद्र गुहा, शुभा मुद्गल, अपर्णा सेन आणि कोंकणा सेन शर्मा यासारख्या बॉलिवूड कलाकारांनी यावर सह्या केल्या आहेत. शातील वाढत्या असहिष्णुतेकडे पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधणे हा हे पत्र लिहिण्याचा उद्देश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -