घरमुंबईआर्किटेक्टसाठी ६,५३२ विद्यार्थ्यांचे अर्ज

आर्किटेक्टसाठी ६,५३२ विद्यार्थ्यांचे अर्ज

Subscribe

1 हजार 44 विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चिती

राज्य सामाईक परीक्षा केंद्रामार्फत (सीईटी सेल) आर्किटेक्चर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत ६ हजार 532 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केले आहे. नाव नोंदणी केलेल्यांपैकी 1044 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केली आहे.

आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी सीईटी सेलकडून मे महिन्यामध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. प्रवेश परीक्षेचा निकाल लागल्यानंतरही प्रवेश नियमावली अभावी प्रवेश प्रक्रिया राबवण्यास विलंब झाला. परंतु मागील आठवड्यात प्रवेश प्रक्रिया सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याने प्रक्रिया रखडली. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने सोमवारपासून सुरू करण्यात आली. नव्याने सुरू झालेल्या आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. सोमवारपासून सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तब्बल 6,532 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 3,599 जणांनी अर्ज पूर्ण भरलेले नाहीत. तर 2,932 जणांनी अर्ज पूर्णपणे भरलेले आहेत. तसेच 1,888 विद्यार्थ्यानी अर्ज पूर्ण भरले आहेत, पण अद्याप निश्चित केलेले नाही. अर्ज निश्चित न करणार्‍यांच्या संख्येच्या तुलनेत अर्ज निश्चित करणार्‍यांची संख्या कमी आहे. नोंदणी केलेल्या पैकी फक्त 1,044 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -