घरटेक-वेकदमदार बॅटरीवाला सॅमसंगचा Galaxy M51 लाँच

दमदार बॅटरीवाला सॅमसंगचा Galaxy M51 लाँच

Subscribe

सॅमसंगने सोमवारी आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M51 लाँच केला आहे. कंपनीच्या वेबसाइटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. वेबसाइटनुसार फोनची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे क्वाड रियर कॅमेरा सेटअप, फिंगरप्रिंट सेन्सरसह 7000mAh बॅटरी. भारतीय बाजारात येण्यासाठी कंपनीने Amazon वर टीझर सादर केला असून सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात हा फोन भारतात लाँच केला जाऊ शकतो. देशात फोनची किंमत ३० हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे.

किंमत

Samsung Galaxy M51 ची किंमत अंदाजे ३१,५०० रुपये आहे. भारतात फोनची किंमत २५ ते ३० हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कॅमेरा

Samsung Galaxy M51 मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात f/1.8 लेन्ससह 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासह 12MP चा कॅमेरा, 5MP चा डेप्थ सेन्सर आणि 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M51 मध्ये ६.७ इंचाचा फुल HD+ Super AMOLED+ इन्फिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 730 SoC प्रोसेसरसह येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज आहे ज्याला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड १० वर आधारित OneUI ऑपरेटिंग सिस्टम आहे. कंपनीने फोनमध्ये एक 7000mAh बॅटरी दिली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -