घरमुंबईभिवंडी तालुक्यातील टोल नाके बंद करण्यासाठी आमसभेत एकमुखी ठराव मंजूर

भिवंडी तालुक्यातील टोल नाके बंद करण्यासाठी आमसभेत एकमुखी ठराव मंजूर

Subscribe

तालुक्यातील रहदारीचे मुख्य रस्ते जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत तालुक्यातील टोल वसूली बंद करण्यात यावी, असा एकमताने ठराव आमसभेत मंजूर करण्यात आला. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार शांताराम मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी तालुक्यातील दुगाडफाटा येथे भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार सभागृहामध्ये आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. आमसभेचे सचिव पंचायत समिती गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के, तहसीलदार शशिकांत गायकवाड, पंचायत समिती सभापती रविना जाधव आदींसह सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, महसूल विभाग, महावितरण कंपनी, कृषी, वनविभाग आदी शासकीय विभागाचे अधिकारी, पं.स.सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यासभेत मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी दिल्यानंतर भाजपचे प्रदेश प्रतिनिधी रामनाथ पाटील यांनी भिवंडी-वाडा व भिवंडी-वसई या दोन टोल रोडवरील रस्ते खड्डेमय झाले असून रस्ते दुरूस्तीपर्यंत सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.या कंपनीचे अनगांव व मालोडी येथील दोन्ही टोलनाके बंद ठेवण्यात यावेत, असा त्यांनी ठराव मांडला असता आमसभेत सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर भाईदास जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने भिवंडी – वाडा रोडवर प्रत्येक नाक्यावर बस थांबे बांधण्याची मागणी केली. तर पंचायत समिती सदस्यांनी पंचायत समिती स्तरावर चार वर्षांपासून न मिळालेला 20 टक्के शेष फंड मिळण्याची मागणी केली. माजी पं. स. सदस्य बबन पाटील यांनी जुनांदूर्खी येथील पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली.त्यावर उपाय योजना करण्याचे निश्चित करण्यात येऊन अन्य प्रमुख मागण्यांसह आमसभेचा समारोप करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -