घरलाईफस्टाईलपौष्टिक नाचणी सत्वाच्या वड्या

पौष्टिक नाचणी सत्वाच्या वड्या

Subscribe

हिवाळ्यात आपल्या शरीरात ऊर्जा अधिक काळ टिकून राहावी यासाठी शरीराला ऊर्जा देणार्‍या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करायला हवा. त्यासाठी नाचणीचे पदार्थ खाणे आवश्यक असते. नाचणीपासून तयार केलेल्या पदार्थात कार्बोहाड्रेडस, प्रोटीन्स, फायबर्स असतातच. यासोबतच सर्वात कमी फॅट्स मुबलक प्रमाणात कॅल्शियम, आयर्न देखील असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात नाचणीचे सत्त्व शरीरात जाणे आवश्यक असते.

साहित्य :
२ वाट्या नाचणीचे सत्व, सत्वाच्या निम्मे गूळ, अर्धा चमचा वेलची पूड, अर्धी वाटी खोबरे आणि सजावटीसाठी काजू

- Advertisement -

कृती :
नाचणी दोन-तीन वेळा नीट धुवून भिजत घाला. भिजलेली नाचणी मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात थोडे पाणी घालून मलमलच्या कपड्यातून गाळून सत्व काढून घ्या. काही वेळ तसेच ठेऊन वर निवळून आलेले पाणी काढून टाका. जेवढे सत्व असेल त्याच्या निम्मे गूळ त्यात बारीक करून घाला. हाताने नीट गूळ विरघळेल तेवढे ते ढवळा. हे मिश्रण मंद गॅसवर ठेऊन सारखे हलवत राहा. जेणेकरून त्यात गुठळ्या तयार होणार नाहीत. हे मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलची पूड घालून हे सत्त्व थंड करत ठेवा. थंड मिश्रण तूप लावलेल्या ताटात थापून वड्या पाडून घ्या आणि त्यावर काजूचे तुकडे घालून सजवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -