घर नवी मुंबई नवी मुंबईमधील नेरुळ येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; 1 एकाचा मृत्यू...

नवी मुंबईमधील नेरुळ येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; 1 एकाचा मृत्यू तर अनेकजण जखमी

Subscribe

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईमधील नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नेरुळ सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीची C विंगचा स्लॅब कोसळला.

नवी मुंबई : नवी मुंबईमधील नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नेरुळ सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीची C विंगचा स्लॅब कोसळला. ही घटना आज बुधवारी रात्री आठ ते साडे वाजता दरम्यान घडली. यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला असून, सहा ते सात जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती अग्नीशन दलाच्या पथकाने दिली आहे.(A slab of a three-storey building collapsed at Nerul in Navi Mumbai; 1 one dead and many injured)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईमधील नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नेरुळ सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीची C विंगचा स्लॅब कोसळला. इमारतीच्या तीन मजल्यांचे स्लॅब थेट तळमजल्यावर आल्याने अनेक लोक जखमी झाले. या घटनेत 6 ते 7 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, जखमींचे नावे अद्याप कळू शकले नाहीत. मात्र घटनेनंतर जखमींना नजिकच्या डीवाय पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : चेंबूरमध्ये वृद्ध व्यक्तीला ‘झिका’ विषाणूची लागण; जाणून घ्या काय असतो ‘झिका’

घटनास्थळी बचाव कार्य सुरू

बचावकार्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दल, महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. रुग्णवाहिका येण्या-जाण्यास अडथळा येत होता. ही घटना कशामुळे घडली यामागील कारण काय होते हे अद्याप तरी समोर आले नाही.

- Advertisement -

हेही वाचा : विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या तयारीचा पवार, ठाकरेंकडून आढावा

काही जण अडकल्याची शक्यता

या घटनेमध्ये काही नागरिक अडकल्याची शक्यता अग्निशमक दलाच्या पथकाने व्यक्त केली आहे. जखमींना डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के योजनेतून इमारत ही इमारत बांधण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे.

 

- Advertisment -