घरक्राइमभेंडीबाजार येथे सिलिंगचे प्लास्टर कोसळून महिला जखमी, जे जे रुग्णालयात दाखल

भेंडीबाजार येथे सिलिंगचे प्लास्टर कोसळून महिला जखमी, जे जे रुग्णालयात दाखल

Subscribe

मुंबई : भेंडीबाजार, गोल देऊळ येथे एका दुमजली इमारतीमध्ये सिलिंगचे प्लास्टर कोसळून महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या महिलेला उपचारासाठी तात्काळ नजीकच्या जे जे रुग्णालयात नेण्यात आले.

मुंबई शहर व उपनगराला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. तर रस्ते आणि रेल्वेवाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. या पावसाच्या तडाख्यामुळे सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत शहर भागात 8 ठिकाणी तर उपनगरे भागात 19 ठिकाणी अशा 27 ठिकाणी झाडे तसेच फांद्या यांच्या पडझडीच्या घटना घडल्या. शहर भागात दोन ठिकाणी तर पश्चिम उपनगरे भागात एका ठिकाणी अशा तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर, शहर व पूर्व उपनगरे भागात प्रत्येकी एका ठिकाणी घरांच्या काही भागांच्या पडझडीच्या घटना घडल्या.

- Advertisement -

संत सेना महाराज मार्ग, गोल देऊळ, भेंडी बाजार येथील तळमजला अधिक दोन मजली पानवाला इमारतीमधील सिलिंगचे प्लास्टर बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कोसळले. या घटनेत वीणा बापू शिंदे (63) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ नजीकच्या जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पालिका वॉर्डातील अधिकारी, कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली.

भांडुप येथे स्लॅब कोसळून पाचवर्षीय मुलीचा मृत्यू
भांडुप (पश्चिम), सोनापूर, क्रॉस रोड येथे तळमजला अधिक पाच मजली झकेरिया या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 202मध्ये मध्य रात्री 3 वाजताच्या सुमारास रहिवासी झोपेत असताना स्लॅब कोसळून तसीन शेख ही पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. तिला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी तात्काळ नेण्यात आले. मात्र तिथे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

- Advertisement -

भिवंडीत 14 वर्षीय बालिकेचा बुडून मृत्यू
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील टेमघर स्मशान भूमी येथील नाल्यामध्ये वाहून गेल्याने सुजाता बबन कदम या 14 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह सापडला असून शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -