घरमुंबईठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारातील वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात !

ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारातील वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात !

Subscribe

गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या सिव्हिल रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारातील वातानुकूलन यंत्रणा नादुरुस्त झाली होती. त्यामुळे ’ठाणे सिव्हिल रुग्णालयात मृतदेहांना नो एंट्री ’ अशी बातमी शनिवारी आपलं महानगर मध्ये प्रकाशित झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या रुग्णालय प्रशासनाने दखल घेत, अखेर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात कली आहे.

गेल्या महिनाभरापासून बंद असलेल्या सिव्हिल रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारातील वातानुकूलन यंत्रणा नादुरुस्त झाली होती. त्यामुळे ’ठाणे सिव्हिल रुग्णालयात मृतदेहांना नो एंट्री ’ अशी बातमी शनिवारी आपलं महानगर मध्ये प्रकाशित झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या रुग्णालय प्रशासनाने दखल घेत, अखेर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात कली आहे. चार दिवसांत दुरूस्तीचे काम पूर्ण होणार असून, सोमवारी शवागारातील वातानुकूलन यंत्रणा सुरू होईल असे शवागारातील कर्मचार्‍यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या शवागरात१२ मृतदेह ठेवण्याची क्षमता असतानाही कित्येक वेळा हा आकडा ४५ पर्यंत जातो. त्यातच गेल्या महिनाभरापासून एक वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ठेवण्यास पोलिसांना नकार दर्शविला होता. शवागारातील मृतदेह हलविल्याशिवाय वातानुकुलन यंत्रणेची दुरुस्त करता येणार नाही असेही कळवले होते. पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाच्या कारभारामुळे शवागारात मृतदेहांना जागा मिळत नव्हती. शनिवारी २५ ऑगस्ट रोजी ‘आपलं महानगर’ ने ही बातमी प्रकाशित केल्यानंतर, त्या बातमीची दखल घेत सिव्हिल रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी वातानुकूलन यंत्रणा तातडीने दुरूस्त करण्याचे आदेश यांत्रिक विभागाला दिले होते. अखेर यांत्रिक विभागाने तातडीने वातानुकूलन यंत्रणेचा दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली असून, युध्दपातळीवर हे काम सुरू आहे. सध्या शवागरात २२ मृतदेह आहेत. मात्र एक वातानुकुलन यंत्रणा सुरू आहे. शवागरातील तापमान राखण्यासाठी बर्फाच्या लादा ठेवण्यात आल्या आहेत. ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयातून ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध भागांतील सुमारे ७०० ते ८०० रुग्ण तपासणीसाठी येतात. तसेच रेल्वे अपघातात दगावलेले पाच ते सहा मृतदेह सिव्हिल रुग्णालयात आणले जातात. मात्र वातानुकूलीन यंत्रणा बंद असल्याने महिनाभरापासून मृतदेह नाकारण्यात येत होते. त्यामुळे मृतदेह कुठे न्यायाचे असा प्रश्न पोलिसांनाही पडला होता त्यांचीही धावपळ उडत होती. अखेर ‘आपलं महानगर’च्या बातमीनंतर महिनाभरापासून बंद असलेल्या वातानुकूलीन यंत्रणेच्या दुरूस्तीला वेग आल्याने रूग्णालय प्रशासन आणि पोलिसांनीही ‘आपलं महानगर’चे आभार मानले

शवागारातील वातानुकूलन यंत्रणेच्या दुरुस्तीला सुरुवात केली आहे. एक वातानुकूलन यंत्रणा सुरू आहे. मात्र शवागरातील तापमान योग्य राखण्यासाठी दुरुस्तीच्या कामापर्यंत दररोज शवागारात बर्फाच्या लादी ठेऊन शवागराचे तापमान नियंत्रणात आणून काम सुरू आहे. दोन दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर २ दिवस चाचणी करण्यात येईल. सोमवारपर्यंत शवागारातील वातानुकूलन यंत्रणा सुरू होईल.
-सतीश मोरे, शवागृह विभाग कर्मचारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -