घरमुंबईठाण्यात दहीहंडीचे ग्लॅमर: यंदा भाजपचीही हंडी, शिवसेनेला शह!

ठाण्यात दहीहंडीचे ग्लॅमर: यंदा भाजपचीही हंडी, शिवसेनेला शह!

Subscribe

मराठमोळया मातीतला दही हंडीउत्सव ठाण्याने जगभरात पोहचवला, नऊ मानवी थरांच्या मनो- याचे विक्रम केले, गोविंदा पथकावर विक्रमी बक्षिसांची उघळण ... ठाण्याने दहीहंडीला वेगळचं गॅलमर मिळवून दिले. ठाण्याच्या दही हंडी उत्सवात शिवसेनेने नेहमीच चढाई केली. मात्र यंदा प्रथमच दहीहंडीच्या शर्यतीत भाजपही संपूर्ण ताकदीनिशी उत्सवात उतरणार आहे

भाजपच्या माथाडी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी या दही हंडीचे आयेाजन केले असून, ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाटयगृहासमोरील चौकात ही दही हंडी उभारली जाणार आहे. भाजपच्या दहीहंडीला मुख्यमंत्र्यांपासून अर्धे मंत्रीमंडळ हजेरी लावणार असल्याने भाजपची दहीहंडी ही लक्षवेधी लढणार आहे.आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव एन्कॅश करण्यासाठी राजकीय पक्ष चांगलेच सरसावल्याचे दिसत असतानाच आता दहीहंडी उत्सवातून शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे.

ठाण्यात दहीहंडीच्या उत्सवाला प्रत्येकवर्षी उधाण आलेले असते. ठाण्यातील दहीहंडी उत्सवामध्ये दरवर्षी काहीना काही तरी विक्रम हा ठरलेला असतो. त्यामुळे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दही हंडी उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. आतापर्यंत ठाण्याच्या दही हंडी उत्सवात भाजप नेहमीच लांबच राहिली होती. यंदा मात्र भाजप दही हंडी उत्सवात संपूर्ण ताकदीनीशी उतरणार आहे. मुख्यमंत्रयापासून ते निम्मे मंत्री मंडळ आणि बॉलीवूड कलाकारापासून गायक मंडळी ठाण्याच्या दही हंडीत आणण्याचे भाजपचे कसोशिने प्रयत्न सुरू आहेत. तसेच भाजपने मुंबईतील सर्व गोविंदा पथकांना आमंत्रण पाठविले आहेत. सर्वात मोठा थर लावणा- यांना ११ लाख रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. विविध थरांना ५० लाख रूपये बक्षीस दिली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी दही हंडीचा उत्सव सुरू केला. टेंभी नाक्यावरील ही मानाची हंडी म्हणूनच ओळखली जाते. सध्या दिघे यांच्या पश्चात पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के हे दही हंडीचे आयेाजनाचे काम पाहतात. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दही हंडीला स्पेन पर्यंत पोहचवली. स्पेनचा गोविंदाने सहभाग घेतल्याने ठाण्यातील दही हंडीची चर्चा जगभर पसरली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, खासदार राजन विचारे या शिवसेनेच्या नेत्यांनी आपआपल्या परिसरात दही हंडी उत्सवाला ग्लॅमर मिळवून दिले. दोन वर्षांपासून मनसेची दही हंडी खूप गाजली. या दही हंडीत १० मानवी थर लावण्यात आले होते. मात्र मनसेच्या अगोदर प्रताप सरनाईक यांच्या दही हंडीने १० थरांचा रेकॉर्ड केला होता. दही हंडीवर विविध प्रकारची बंधने आल्याने आता प्रो कबड्डीच्या धर्तीवर प्रो गोविंदाची संकल्पना आमदार सरनाईक हे राबवणार आहेत.दही हंडीला ग्लॅमर मिळवून देणा- या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या दोन वर्षापासून दही हंडी उत्सव बंद केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेच्या दही हंडीत आता भाजपचीही दही हंडी पाहावयास मिळणार आहे.

ठाण्यातील दही हंडी उत्सव

- Advertisement -

टेंभी नाका दही हंंउी उत्सव : एकनाथ शिंदे, पालकमंत्री/ नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख शिवसेना
जांभळी नाका दही हंडी उत्सव :राजन विचारे, खासदार शिवसेना
रघुनाथ नगर : रविंद्र फाटक , आमदार शिवसेना
वर्तकनगर : प्रताप सरनाईक, आमदार शिवसेना
भगवती विद्यालय : अविनाश जाधव, मनसे प्रमुख ठाणे

 

दही हंडी कोणीही लावू शकतो. दही हंडी कुठल्या पक्षाची नाही. मात्र सोनं ते सोनंच असत. टेंभीनाक्यावरील दही हंडीची तयारी सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह अनेकजण हजर राहू शकतात. – नरेश म्हस्के, जिल्हा प्रमुख शिवसेना 

गेल्या दोन वर्षापासूनच दही हंडी करण्याचे प्रयोजन होते. मात्र सुप्रीम कोर्टाचेही निर्बंध होते. त्यामुळे दही हंडीला उभारली नाही. यंदा दही हंडी उत्सव होणार आहे. कोणाला शह देण्याचा हेतू नाही. दही हंडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. तसेच उत्सवाच्या माध्यमातून केरळ पूरग्रस्तांसाठी आणि आत्महत्या ग्रस्त शेतक- यांच्या मुलांसाठी शिक्षणसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत दिला जाणार आहे. आदिवासी विद्याथ्यांना दत्तक घेतले जाणार आहे. –शिवाजी पाटील, अध्यक्ष माथाडी संघटना भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -