घरमुंबईअपघातग्रस्त कामगाराची उपचारासाठी धडपड; कुटुबांवर उपासमारीची वेळ

अपघातग्रस्त कामगाराची उपचारासाठी धडपड; कुटुबांवर उपासमारीची वेळ

Subscribe

अवस्थेत उपचाराविना वाऱ्यावर सोडून देण्याचा प्रकार नेव्हल डॉक येथे कंत्राटी कामगारावर ओढवला आहे. चालता येत नसल्याने घरी बसावे लागत असल्याने कुटंबाची दैनिय अवस्था झाली आहे.

काम करीत असताना अपघात झाला असतानाही जखमी अवस्थेत उपचाराविना वाऱ्यावर सोडून देण्याचा प्रकार नेव्हल डॉक येथे कंत्राटी कामगारावर ओढवला आहे. चालता येत नसल्याने घरी बसावे लागत असल्याने कुटंबाची दैनिय अवस्था झाली आहे. मात्र कंत्राटदार कोणत्याही प्रकारचा संपर्क करीत नसल्याने सदर कामगारावर उपचाराविना पाय फ्रॅक्चर होण्याची वेळ आली आहे.

कळव्यातील टाकोली मोहल्ला येथे राहणारे साजिद रशीद शेख हे एका फॅब्रीकेटर कॉन्ट्रक्टरकडे कामाला होते. दिनांक४ जुन रोजी काम करताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात पायाला दुखापत होऊन तो फ्रॅक्चर झाल्याचे प्रथम
दर्शनी तपासात निष्पन्न झाले. मात्र कॉन्ट्रक्टरने त्यांना कोणताही प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही शिवाय औषधोपचाराचा खर्चही दिला नसल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. नेव्हल डॉक येथे फॅब्रीकेटर वेल्डींगच्या कामाचे कंत्राट अंधेरीच्या यश इंजिनिअरींग या कॉन्ट्रक्टरला देण्यात आले होते. सदर काम यश इंजिनिअरचे हिमांशू पटेल यांनी दुसऱया एका सब कॉन्ट्रक्टरला दिले. या कॉन्ट्रक्टरच्या ताफ्यामध्ये सजिद हे मागील काही वर्षापासून काम करीत होते. ४ जुन रोजी नेव्हल डॉक येथील चितागेट परिसरात काम करित असताना उंचावरील ट्रॉलीमधून पडून त्यांचा अपघात झाला.

- Advertisement -

सुदैवाने ते या अपघातातून बचावले मात्र त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. इतर कामगारांनी त्यांना तातडीने जवळ असलेल्या महापालिकेच्या सेन्ट जॉर्ज रुग्णालयात नेले. रुग्णालयात गेल्यावर केवळ प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. मोठा फ्रॅक्चर असूनही कॉन्ट्रक्टरने पोलिस दप्तरी नोंद होईल या भीतीपोटी सेन्ट जॉन रुग्णालयात भरती केले नाही. त्यांना त्याच परिस्थितीत त्यांच्या राहत्या घराजवळील कळवा येथे खाजगी रुग्णालयात आणले. औषधोपचाराच्या सर्व खर्चासह भरपाई देऊन असे आश्वासन यावेळी कॉन्ट्रक्टरने दिले. मात्र याबाबत कुठेही वाच्यता करायची नाही असे बजावले. त्यामुळे सजिद यांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नाही.

कळव्यातील मनिषा नगर येथील प्रमिला रुग्णालयात उपचार मलमपट्टी प्लास्टर आणि १५ दिवसाचे औषध देण्यात आले. त्याचे प्राथमिक बील भरल्यानंतर कॉन्ट्रक्टरने तेथून पळ काढला. १५ दिवसानंतर सजिद प्रमिला रुग्णालयात
पुन्हा उपचारासाठी गेले असता डॉक्टरांनी पुढील औषधोपचाराचे पेमेंट करण्यासाठी सांगितले. कॉन्ट्रक्टर देणार असल्याचे साजिद यांनी रुग्णालयाला सांगितले असता त्याबाबत आम्हाला कोणतीही सूचना नसून कॉन्ट्रक्टरला आम्ही ओळखत नाही. यापुढचा औषधाचा खर्च दिल्याशिवाय आम्ही कोणताही उपचार करू शकत नसल्याचे सांगत प्रमिला रुग्णालयाचे डॉ.सुनिल भडजन यांनी उपचार करण्यास नकार दिला आहे. पायाला पुन्हा नवीन प्लास्टर बसवायचे होते. मात्र पैसे नसल्यामुळे अद्यापही पायाला प्लास्टर बसवलेले नाही. त्यामुळे भविष्यात अपंगत्व येण्याचा धोका संभवण्याची शंका साजिद यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

सजीद यांना एक पाच वर्षाची तर दुसरी अडीच वर्षाची अशा दोन मुली आहेत. घरामध्ये कमवाते ते एकच असल्याने आज महिनाभर त्यांच्या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चालता येत नसल्याने ते घरामध्येच पडून
असतात. साजिद वारंवार सब कॉन्ट्रक्टर शोएब अली शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याने फोन स्वीचऑफ करून ठेवला आहे. त्यामुळे आज सजिद यांच्या कुटुंबावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.

हम डेलीव्हेजेसपे कामगार रखते है। जिन्हे हररोज पगार दिया जाता है, अब उनका काम है की काम करते वक्त सावधानीसे करे। अगर कुछ हो जाता है, तो यह उनकी खुद की जिम्मेदारी है, हमने उनके साथ कोई अ‍ॅग्रीमेंट नही किया है। फिर भी हमने साजीद को प्रायव्हेट अस्पतालसे इलाज कराया। अब उनकी अपनी जिम्मेदारी है की वे आगे ईलाज करवाये
– सब कॉन्ट्रक्टर शोएब अली शेख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -