घरमुंबईअभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक

अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक

Subscribe

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला जुगारप्रकरणी अंबोली पोलिसांनी अटक केली आहे.

‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेश्री भाग्यश्रीच्या पतीला जुगारप्रकरणी अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २६ जणांना अटक केली असून दसानीचाही यात सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अंबोली पोलिसांनी ही कारवाई केली.

२६ जणांना अटक

अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात पोकरच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती अंबोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी धाड टाकत पोलिसांनी घटनास्थळावरुन १८ जणांना अटक केली. पुढील चौकशीअंती पोलिसांनी आणखी काही जणांना अटक केली. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणी एकूण २६ जणांना अटक करण्यात आली आहे. ”अभिनेश्री भाग्यश्रीचा पती दसानीचाही या जुगारात सहभाग असल्याचे उघड झाल्यावर त्यालाही अटक करण्यात आल्याचे”, अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले.

- Advertisement -

हिमालय दसानी बांधकाम व्यावसायिक

राजश्री प्रॉडक्शनच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटात अभिनेता सलमान खान सोबत अभिनेत्री भाग्यश्रीने काम केले होते. चित्रपटाच्या यशानंतर लगेचच १९९० मध्ये भाग्यश्रीने हिमालय दसानीसोबत लग्नबंधनात अडकली. त्यानंतर भाग्यश्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला. हिमालय दसानीचा बांधकाम व्यवसाय असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -