घरमुंबईमध्यमवर्गीयांसाठी अफोर्डेबल घरांचा पर्याय !

मध्यमवर्गीयांसाठी अफोर्डेबल घरांचा पर्याय !

Subscribe

मध्यमवर्गाकडून मोठ्या प्रमाणात परवडणार्‍या घरांची मागणी सातत्याने वाढत आहे. कर्जत, कसारा आणि शहापूर या परिसरात परवडणारी घरे उभी राहत असल्याने ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. अनेक मुंबईकर घर विकून बदलापूर आणि त्यापुढील परिसरात स्थायिक होत आहेत तर अनेकजण झालेही आहेत. त्यामुळे बदलापूर, टिटवाळापासून ते कर्जत कसारापर्यंतच्या गृहप्रकल्पांकडे मध्यमवर्गीयांचा ओढा वाढला आहे.

मुंबई आणि उपनगरांमधील घरांचे दर कोटींची उड्डाणे करीत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मुंबईत घर घेणे शक्य नसलेला मध्यमवर्ग ठाणे, नवी मुंबई, पनवेलपासून थेट कर्जत, कसारा, खोपोली, नवीन पनवेल, पेण, विरार, पालघरपर्यंत घरांच्या शोधात भटकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी परवडणारी घरे, ही संकल्पना मांडलीय. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात अजूनही सरकारची परवडणारी घरे तयार झालेली नाहीत. मात्र मुंबईतील बड्या विकासकांचे परवडणार्‍या घरांचे अनेक प्रकल्प ठाण्यापुढील परिसरात सुरू असल्याने त्यांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. निसर्गाच्या कुशीत असणार्‍या या परवडणा-या घरांबरोबरच, सेकंड होम आणि प्लॉटही साकारले जात आहेत. भविष्यातील गुंतवणूक म्हणून ग्राहकांचा त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.

ठाणे कल्याण परिसरातही ५० लाखापासून ते कोटीपर्यंत घरांच्या किमतीनी मजल मारली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांनी बदलापूर आणि टिटवाळापासून कर्जत कसारा या परिसरात आपला मोर्चा वळवला आहे. याठिकाणी जागांच्या आणि घरांच्या किंमती स्वस्त आहेत. त्यामुळे सध्या बड्या विकासकांचे मोठमोठे गृहप्रकल्प सुरू आहेत. मध्यमवर्गाकडून मोठ्या प्रमाणात परवडणार्‍या घरांची मागणी सातत्याने वाढत आहे. मात्र कर्जत, कसारा आणि शहापूर या परिसरात परवडणारी घरे उभी राहत असल्याने ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. सध्या जमिनीचे दर, बांधकाम खर्च यात सतत होणारी वाढ पाहून मुंबईसारख्या शहरात स्वत:चे घर घेणे, ही बाब सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची आहे, त्यामुळे त्यांची स्वप्नपूर्ती होण्याची शक्यता कमीच आहे.

- Advertisement -

त्यामुळे मोकळ्या निर्सगरम्य वातावरणात बजेटमध्ये घर उपलब्ध हेात असल्याने अनेक मुंबईकर हे घर विकून बदलापूर आणि त्यापुढील परिसरात स्थायिक होत आहेत तर अनेकजण झालेही आहेत. त्यामुळे बदलापूर, टिटवाळापासून ते कर्जत कसारापर्यंतच्या गृहप्रकल्पांकडे मध्यमवर्गीयांचा ओढा वाढला आहे. मुंबईपासून कर्जत व कसारा या परिसरात जाण्यासाठी स्वंतत्र लोकल आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने रेल्वे मार्गाचा मोठा आधार आहे. तसेच रोड कनेक्टिव्हीटी आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळालीय त्यामुळे भविष्यात हा परिसर चांगलाच विकसित होणार आहे. मुंबई ठाण्याच्या तुलनेत कर्जत् कसारा शहापूर टिटवाळा येथील जागांच्या किमती कमी आहेत. त्यामुळे अनेक मोठमोठ्या विकासकांकडून या परिसरात गुंतवणूक करून मेगा प्रोजेक्ट साकारीत आहेत. त्यामुळे गुंतवणुकीबरोबरच मध्यमवर्गीयांना परवडतील अशी अफोर्डेबल घरे उपलब्ध होत आहेत. १५ लाखापासून ते २० लाखापर्यंत वन बीएचके प्लॅट उपलब्ध होत आहेत. कल्याण शहर झपाट्याने वाढत आहे.

जुने कल्याणनंतर गेल्या पाच सात वर्षात गोदरेज हिल खडकपाडा या परिसरात मोठे गृहप्रकल्प साकारले आहेत. आता आधारवाडी गांधारी उंबर्डे या परिसरात मोठमोठ्या विकासकांचे प्रकल्प उभे राहत आहेत. तिसरं कल्याण म्हणून हा परिसर विकसित होत आहे. शहरापासून लांब अंतरावर हे प्रोजेक्ट सुरू आहेत. त्यामुळे रिक्षा स्वत:चे वाहन अथवा परिवहन बसेसवर अवलंबून राहावे लागणार आहे. कल्याणातही प्रत्येक चौरस फूटाला पाच ते सहा हजारापर्यंत भाव आहे तर स्टेशन परिसरातही आठ ते दहा हजारापर्यंत भाव गेला आहे. डोंबिवलीतही याहून वेगळी स्थिती नाही त्यामुळे कल्याण डोंबिवलीत घर घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच गेलं आहे. मात्र कल्याण डोंबिवली पेक्षाही कमी किमतीत अंबरनाथ बदलापूर अथवा शहापूर टिटवाळा परिसरात घर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी ग्राहकांची पसंती वाढू लागली आहे. लोकसंख्येच्या निकषावर अंबरनाथ, बदलापूर ही महापालिकाही अस्तित्वात येऊ शकते. याठिकाणी बरेच छोटे टाऊनशिप प्रोजेक्ट साकारले जात आहेत. अनेक सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे.

- Advertisement -

मालमत्ता बाजारपेठेत वेगाने विकसित होणारे आणि नवीन घरांचा पर्याय उपलब्ध करून देणारे महानगर म्हणून या शहरांकडे पाहिलं जातं. बदलापूरप्रमाणेच अंबरनाथ, टिटवाळा, शहापूर, नेरळ, कर्जत, कसारा येथे गुंतवणुकीला प्राधान्य मिळत आहे. कर्जत माथेरान या परिसरातही जागेच्या किमती मुंबई उपनगर आणि नवी मुंबईच्या तुलनेत अनेक पटींनी स्वस्त असल्याने इथले प्रोजेक्ट्स आणि त्यात उपलब्ध होणारी घरंही तुलनात्मकरीत्या स्वस्त आहेत. त्यामुळे सामान्य मध्यमवर्गीय ग्राहकाला इथली गुंतवणूक सोयीची ठरत आहे. नेरळ हे पूर्वी वीकेण्ड होम डेस्टीनेशनसाठी अत्यंत लोकप्रिय होते. झपाट्याने होणार्‍या शहरीकरणामुळे या भागाकडे आता ग्राहक फर्स्ट होमचा ऑप्शन म्हणूनही पाहू लागले आहेत.

सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी घरे, उत्तम हवामान, निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त असा सगळा मेळ जुळून येत असल्याने ग्राहकांचा ओढा या परिसरात अधिक वाढलाय. कल्याण आणि आसनगाव दरम्यान मुंबई रेल्वे महामंडळाच्या माध्यमातून नवी मार्गिका टाकण्यात येणार आहे तसेच कल्याण बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका करण्याचे रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे कर्जत आणि कसारा येथील प्रवाशांसाठी ही खुशखबर आहे. त्यामुळे मुंबईपासून कर्जत आणि कसार्‍याकडील रेल्वे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -