घरमहाराष्ट्रदुष्काळामुळे मोरांची होतेय होरपळ

दुष्काळामुळे मोरांची होतेय होरपळ

Subscribe

पुणे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे मानवी जीवन विस्कळीत होत आहे. त्याचवेळी या दुष्काळाचे चटके पशु-पक्षांना बसत आहेत. त्यांची अन्नपाण्यासाठी वनवन सुरु आहे. देशाचा राष्ट्रीय पक्षी असणार्‍या मोरांचे वास्तव्य खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. या मोरांना अन्न, पाण्यासाठी वनवन करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

खरपुडी येथील खंडोबा मंदिर परिसरातील वनविभागाच्या हद्दीत मोरांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. या खंडोबा मंदिरात येणारे भाविक या ठिकाणी मोरांना खाद्य देत असतात. तर देवस्थानच्यावतीने पाण्याची व्यवस्था करण्यात येते.मात्र सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्याचा फटका मोरांना बसला आहे. या मोरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तसेच खाण्यास फारसे काही मिळत नसल्यामुळे ते केवळ देवळात येणार्‍या भाविकांकडून काही खाद्यपदार्थ मिळते का या आशेवर आहेत.

- Advertisement -

खेड तालुक्यातील खरपुडी,खेड घाट,तिन्हेवाडी,कन्हेरसर, वरुडे,मोराची चिंचोली,या वनविभाग व परिसरात मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी मोरांना अन्न-पाणी मिळत नसल्याने अनेक वेळा मोरांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी मोरांच्या अन्नपाण्यासाठी मदत करावी.
-डॉ. शितल पवार, प्राणी -पक्षी मित्र

खरपुडी खंडोबा मंदीराच्या परिसरात मोरांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. या मोरांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्यांना खाण्यास धान्य जास्त प्रमाणात लागत आहे. समाज्यातील दानशुर व्यक्तींनी मोरांसाठी धान्य उपलब्ध करुन द्यावे.
राजेंद्र गाडे, पुजारी, खंडोबा देवस्थान.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -