घरदेश-विदेशउत्तर प्रदेश-गुजरातनंतर आणखी एका भाजप शासित मुख्यमंत्र्यांचा मुंबईत रोड शो; काय आहे कारण

उत्तर प्रदेश-गुजरातनंतर आणखी एका भाजप शासित मुख्यमंत्र्यांचा मुंबईत रोड शो; काय आहे कारण

Subscribe

मुंबई : नुकतेच गुजरातचे मुख्यंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी मुंबई दौऱ्यादरम्यान ‘व्हायब्रंट गुजरात समिट’साठी महाराष्ट्रातील उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री आले होते. त्यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील मुंबई दौरा केला होता. तेव्हा देखील योगी आदित्यनाथ यांनी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर समिट’मध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. यानंतर आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी उद्योजकांना गुंतवणूकीसाठी त्यांच्या राज्याते येण्याचे आवाहन करण्यासाठी उद्या मुंबईत येणार आहेत.

पुष्कर सिंह धामी मुंबईतील कुलाबा येथे हॉटेल ताजमध्ये उद्योगपतींसोबत उद्या (6 नोव्हेंबर) बैठक होणार आहे. यासाठी अनेक उद्योगपतींना बोलवण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये होण्याऱ्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या प्रचारासाठी पुष्कर सिंह धामी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यासाठी मुंबईमध्ये पुष्कर सिंह धामी यांनी रोड शो आयोजित करण्यात आला आहे. यात पुष्कर सिंह धामी रोड शो या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तराखंडमध्ये गुंतवणक आणत आहेत. आतापर्यंत देश-विदेशातून रोड शो आणि सभांमध्ये 94 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे करार झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राज्यात आज 2369 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांची रणधुमाळी, मतदानाला सुरुवात

मुंबई आयोजित करण्यात आलेल्या रोड शोमध्ये एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा आकडा पार करेल, अशा विश्वास पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर उत्तराखंड सरकारने जागतिक गुंतवणूक परिषदेसाठी 2.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांचे लक्ष्य ठेवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काय लागू शकतो पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल? वाचा, सर्वेक्षणाचा अंदाज

आतापर्यंत उत्तराखंडमधअये झाल्या ऐवढ्या गुंतवणूक

पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडमध्ये रोड शोसाठी देश-विदेशातील गुंतवणुकदारांना आमंत्रित केले आहे. या रोड शोची सुरुवात दिल्लीतून केली. यावेळी 7600 कोटी रुपयांचे करार करण्यात आले असून दिल्लीत झालेल्या रोड शोधमध्ये 19 हजार कोटी रुपयांचा करार करण्यात आले. त्याबरोबर दुबई आणि अबूधाबी येथे झालेल्या रोड शोधमध्ये 15 लाख 475 कोटी रुपयांचे करार झाले आहेत. यानंतर पुष्कर सिंह यांच्या ब्रिटीनदौऱ्यात त्यांनी 12 लाख 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -