घरElection 2023काय लागू शकतो पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल? वाचा, सर्वेक्षणाचा अंदाज

काय लागू शकतो पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल? वाचा, सर्वेक्षणाचा अंदाज

Subscribe

नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीच्या फटाक्यांसोबतच निवडणुकीचे फटाके देखील फुटणार आहेत. कारण देशातल्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.

5 State Election Survey : नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळीच्या फटाक्यांसोबतच निवडणुकीचे फटाके देखील फुटणार आहेत. कारण देशातल्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. यातल्या छत्तीसगड आणि मिझोराममध्ये मंगळवारी 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ज्यामुळे या राज्यातल्या निवडणुकीच्या प्रचार तोफा आज (ता. 05 नोव्हेंबर) थंडावणार आहेत. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या राज्यात होणाऱ्या निवडुणकांचे वेगवेगळ्या संस्थांमार्फत करण्यात आलेले सर्वेक्षणाचे अंदाज समोर आले आहेत. परंतु सी-वोटरकडून पाचही राज्यांसंदर्भातील सर्वेक्षण अहवाल समोर आलेला आहे. (C-Voter gives poll report on five state elections)

हेही वाचा – राज्यात आज 2369 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांची रणधुमाळी, मतदानाला सुरुवात

- Advertisement -

सी-व्होटरकडून समोर आलेल्या माहितीनुसार, या सर्वेक्षण कंपनीकडून अंतिम जनमत चाचणी घेण्यात आली असून या जनमत चाचणीसाठी त्यांनी 63 हजार लोकांशी संवाद साधला. 9 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत सी-व्होटरने पाच राज्यात सर्वे केला. त्यानुसार, मिझोराम राज्यात एमएनएफ म्हण जेच मिझो नॅशनल फ्रंट या पक्षाला 36 टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेसला 30 टक्के आणि झेडपीएमला 26 टक्के मते मिळू शकतात. तसेच इतरांना 9 टक्के मते मिळू शकतात, असा अंदाज समोर आला आहे. या सर्वेक्षणामध्ये मिझो नॅशनल फ्रंट पक्षाला 17 ते 21 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 6 ते 10, झेडपीएमला 10 ते 14 आणि इतरांना 0 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

छत्तीसगढमध्ये सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला 45 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 43 टक्के आणि इतरांना 12 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणामध्ये काँग्रेसला 45 ते 51 जागा, भाजपला 36 ते 42 जागा आणि 2 ते 5 जागांवर इतर पक्षांचे उमेदवार विजयी होण्याची माहिती सर्वेच्या माध्यमातून समोर आली आहे.

- Advertisement -

राजस्थान राज्यात सी-व्होटरच्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, काँग्रेसला 42 टक्के, भाजपला 45 टक्के आणि इतरांना 13 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर, विधानसभेच्या 200 जागांपैकी काँग्रेसला 67 ते 77 जागा, भाजपला 114 ते 124 जागा आणि 5 ते 13 जागा इतरांना मिळू शकतात. म्हणजेच, नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील राजस्थानमध्ये सत्ता बदल होणे हे जवळपास निश्चित आहे.

मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चुरस असल्याचे चित्र सर्वेक्षणाच्या माध्यमातून समोर आले आहे. ‘सी व्होटर’च्या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशामध्ये काँग्रेसला 45 टक्के, भाजपला 42 टक्के आणि इतरांना 13 टक्के जनतेचा कौल मिळू शकतो. 230 विधानसभेच्या जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसला 118 ते 130 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपला 99 ते 111 जागा आणि 0-2 जागा इतरांच्या मिळण्याची शक्यता आहे.

तर, दक्षिणेकडील राज्य तेलंगणामध्ये सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला 39 टक्के मते, भाजपला 14 टक्के, बीआरएसला 42 टक्के मते आणि अपक्षांना 6 टक्के मते मिळू शकतात. सर्वेक्षणानुसार तेलंगणात काँग्रेसला 43 ते 55 आणि भाजपला 5 ते 11 जागा मिळू शकतात. तर बीआरएसला 49 ते 61 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, इतर पक्षांना 4-10 जागांवर विजय मिळण्याची शक्यता या सी-व्होटरच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -