घरताज्या घडामोडी'खोटं बोल पण रेटून बोल, हेच चाललंय', अजित पवारांनी टोचले कान!

‘खोटं बोल पण रेटून बोल, हेच चाललंय’, अजित पवारांनी टोचले कान!

Subscribe

विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी विरोधकांनी केलेल्या अनेक आरोपांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी गेल्या २ दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असलेल्या मंत्र्यांच्या थकीत पाणीपट्टीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी माध्यमांची खरडपट्टी काढली. तसेच, ‘माध्यमांमध्ये दाखवलेल्या मुद्द्यांवरून काहीजण आपली मतं बनवत आहेत’, असं म्हणत त्यांनी विरोधकांना देखील यावेळी चिमटा काढला. तसेच, विरोधी बाकांवर बसलेल्या काही माजी मंत्र्यांचीच बिलं अजून देखील थकीत आहेत, असं म्हणत अजित पवारांनी आकडेवारीच सादर केली.

काय म्हणाले अजित पवार?

विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना अजित प्रवार म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च झाल्याचं चालवलं जात होतं. आत्तापर्यंत हे सरकार आल्यापासून मंत्र्यांच्या बंगल्यावर १७ कोटी ८० लाख रुपये खर्च झाले आहेत. दाखवल्या जात असलेल्या एकूण बिलामध्ये मंत्र्यांचे बंगले, सदनिका, विधानसभा, मंत्रालय, उच्च न्यायालयाच्या इमारती, शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासी, कार्यालयं अशा सगळ्यांचा समावेश होतो’, असं त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

दरम्यान, थकीत बिलामध्ये विरोधी बाकांवर बसलेल्या काही माजी मंत्र्यांची देखील थकीत पाणीपट्टीची बिलं आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं. ‘९० कोटींमध्ये २० कोटींची मागच्या सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यांची थकीत बिलं आहेत. आमच्या काळातले १७ कोटी ८० लाख आहे. माझी मीडियाला विनंती आहे की माहिती घेऊन खर्च दाखवावा. धनंजय मुंडे यांच्या चित्रकूट बंगल्यावर ३ कोटी ८९ लाख रुपये खर्च झाला असं दाखवलं. तिथे तर ८९ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती मला मिळाली. मुख्यमंत्र्यांच्या थकित बिलावर देखील तक्रार आली. पण वर्षा बंगल्याची एक रुपयाची देखील पाणीपट्टीची थकीत नाही. देवगिरी बंगल्याची देखील तशीच गोष्ट आहे. काही लोकं बातम्यांवर विश्वास ठेऊन स्वत:चं मत तयार करतात. यावर कोणतंही तथ्य नाही. खोटं बोल पण रेटून बोल असं चाललं आहे’, असं ते म्हणाले.

दरम्यान, ‘केंद्र सरकारकडून जीएसटीच्या परताव्यापोटीचे तब्बल ३० हजार ५३७ कोटी ६२ लाख रुपये येणे बाकी आहे, तरी देखील राज्य सरकारने कोरोना काळात किंवा शेतकऱ्यांना मदत पुरवण्यात, नुकसानभरपाई देण्यात निधीची कमतरता कधीही भासू दिली नाही’, असं देखील अजित पवारांनी यावेळी नमूद केलं. ‘केंद्र सरकारने सांगितलं की ज्या त्या राज्याने कोरोना काळातील खर्च करावा. संकट सगळीकडेच होतं. अशा काळात रस्त्यावर उतरून कोविड काळात पंतप्रधानांनी घंटानाद, थाळीनाद करायला सांगितला. मंदिरं बंद होती. ती सुरु करण्याच्या कामात देखील राजकारण केलं गेलं’, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.


हेही वाचा – ‘नागपूरचा पराभव विरोधकांना विशेष झोंबला’; अजितदादांची चौफेर फटकेबाजी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -