घरमुंबईअजित पवारांबाबत रत्नागिरीच्या सभेमध्ये सविस्तर बोलणार; राज ठाकरेंकडून संकेत

अजित पवारांबाबत रत्नागिरीच्या सभेमध्ये सविस्तर बोलणार; राज ठाकरेंकडून संकेत

Subscribe

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) भाजपासोबत जाणार आणि महाराष्ट्रात राजकीय भूंकप होणार अशा चर्चा सुरू होत्या. यावर अजित पवार यांनी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे सांगितले होते. या संदर्भात राज ठाकरे यांना एका कार्यक्रमात अजित पवार यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे (raj thackeray) म्हणाले की, त्यांच्याबद्दल रत्नागिरीच्या सभेत सविस्तर बोलणार आहे.

एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना महाराष्ट्र राज्यातील विविध नेत्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी काही मजेशीर उत्तरे दिली आहेत.

- Advertisement -

यावेळी राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विचारले असता  जपून राहा असा सल्ला देणार, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विचारले असता वरती संबंध नीट ठेवा, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विचारले असता त्यांना काय सांगणार स्वयंभू आहेत असे ते म्हणाले. यावेळी त्यांना अजित पवार यांच्याबद्दल विचारले असता राज ठाकरे यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, खर तर मला 5 तारखेच्या रत्नागिरीच्या सभेमध्ये त्यांच्याबद्दल सविस्तर बोलायचे आहे, असे संकेत त्यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, मला एका वाक्यात बोलता नाही येणार नाही, पण तरीही त्यांना सल्ला देईल की, बाहेर जेवढे लक्ष देत आहात तेवढं काकांकडेपण लक्ष द्या.

- Advertisement -

अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना प्रश्न विचारले की, तुमची डॉन इमेज आहे ती तुम्ही जाणून बुजून तयार केली आहे की, तुमचे आंदोलन बघून लोक तुम्हाला घाबरतात, यावर त्यांनी उत्तर दिले की, तयार केलेली गोष्ट नाही आहे, कारण तयार केलेली गोष्ट तात्पुरती असते. मी काही डॉन नाही, पण मी तसा नो-नॉनसेन्स असा माणूस आहे. त्याच्यामुळे मी कदाचित परखडपणे बोलतो, स्पष्टपणे बोलतो, पण मी उद्घटपणे नाही बोलत. अनेकवेळा लोकांना स्पष्टपणा आणि उद्घटपणा यातला फरक समजत नाही. पण स्पष्टपणे बोलत असल्यामुळे मला राग खूप पटकन येतो आणि मावळतो पटकन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -