घरमुंबईजून अखेरीस अंबानी वाटणार साखर !

जून अखेरीस अंबानी वाटणार साखर !

Subscribe

मुकेश आणि नीता अंबानीच्या घरामध्ये लवकरच शुभकार्य होणार आहे. या महिन्याच्या शेवटी त्यांचा मुलगा आकाश आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. हा सोहळा पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे.

कधी आणि कुठे होणार साखरपुडा ?
दक्षिण मुंबईतील लॅमेंटन रोड येथील मुकेश अंबानी यांच्या अॅन्टिलिया या आलिशान घरामध्ये येत्या ३० जून रोजी हा सोहळा पार पडणार आहे. या समारंभाची आमंत्रण पत्रिकाही हटके बनवण्यात आली आहे. व्हिडीओच्या माध्यमातून आकाश आणि श्लोकाने त्यांच्या खास सोहळ्यासाठी पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. या व्हिडीओत आकाश आणि श्लोका पारंपरिक पोषाखात दिसत आहेत. ‘काय पो चे’ या चित्रपटातील ‘हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आयी…’ या गाण्याच्या माध्यमातून आकाश आणि श्लोका आमंत्रितांना ३० तारखेचा दिवस राखून ठेवा, असे सांगत आहेत.

- Advertisement -

कधी होणार लग्न ?
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स ग्रुपचे संचालक मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश त्याची प्रेयसी श्लोकासोबत लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. मार्च महिन्यात गोव्यामध्ये दोघांचे प्री एंगेजमेंट शूट करण्यात आले होते. त्यानंतर आता जूनमध्ये त्यांचा साखरपुडा होत आहे. लग्न मात्र वर्षाअखेरीस डिसेंबरमध्ये होणार असल्याचे समजते. डिसेंबरच्या ८ ते १० तारखेदरम्यान लग्नाचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. हा सोहळा ४ ते ५ दिवस चालणार असून मुंबईत पार पडेल.

- Advertisement -
आकाश आणि श्लोकाचे प्री शूट

कोण आहे अंबानीची होणारी सून ?
श्लोका ही रसेल मेहता यांची छोटी मुलगी आहे. श्लोकाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत अॅन्थ्रोपोलॉजी अर्थात मानववंशशास्त्राचं शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्लोका आपल्या वडिलांच्या हिऱ्याच्या कंपनीत संचालक बनली. याशिवाय ती ‘connect for’ या संस्थेची संस्थापक आहे. जी एनजीओंना मदत करते.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -