घरताज्या घडामोडी'राज' पुत्राचा मदतीचा हात, मार्डला पीपीई किट्स, मास्कची मदत

‘राज’ पुत्राचा मदतीचा हात, मार्डला पीपीई किट्स, मास्कची मदत

Subscribe

मनसे नेते अमित ठाकरे यांनी १ हजार पीपीई किट्स, तसेच मास्कची मदत 'मार्ड' या डॉक्टरांच्या संघटनेला केली आहे.

राज्यात कोरोनाच्या संकटामध्ये सध्या मदतीचे हात पुढे येत असून, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था मदत करताना पहायला मिळत आहे. अशीच मदत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी ही मदत स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करत डॉक्टरांना केली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी १ हजार पीपीई किट्स, तसेच मास्कची मदत ‘मार्ड’ या डॉक्टरांच्या संघटनेला केली आहे. त्यानंतर मार्डच्या वतीने अमित ठाकरे यांचे आभारही मानले आहेत. विशेष म्हणजे त्यानंतर मार्डने अमित ठाकरेंना आभाराचे पत्र पाठवले आहे.

‘राज’ठाकरेंनी मानले मार्डचे आभार

- Advertisement -

दरम्यान, अमित ठाकरे यांना मार्डने आभार व्यक्त करणारे पत्र पाठवल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत डॉक्टरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत तुम्ही आभार मानण्याची गरज नाही आमचे कुटुंबच तुमचे आभारी असल्याचे राज ठाकरे म्हणालेत.

- Advertisement -

आज अमित ठाकरेंनी महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी १ हजार पीपीई किट्स आणि मास्क डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेकडे सुपूर्द केले त्याबद्दल मार्डने अमितचे आभार मानले. पण, हे डॉक्टर्स जसे जीवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत त्याबद्दल माझे कुटुंबच या डॉक्टरांचे आभार मानू इच्छितो, असे राज ठाकरे यावेळी म्हणालेत.

मनसेच्या कार्यकर्त्यांकडूनही राज्यभर मदत

सगळ्यात महत्वाचे म्हणजे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील विविध पद्धतीची मदत राज्यातील जनतेला करताना दिसत आहेत. नुकतीच मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी घरोघरी जाऊन धान्य वाटप केले आहे.


हेही वाचा – धान्य मिळत नाही ; येथे करा संपर्क


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -