घरमुंबईउंच इमारतीवरून लोखंडी रॉड कोसळला; पादचाऱ्याची बोटे तुटली, हात फ्रॅक्चर

उंच इमारतीवरून लोखंडी रॉड कोसळला; पादचाऱ्याची बोटे तुटली, हात फ्रॅक्चर

Subscribe

मुंबई : वरळी येथे एका 32 मजली इमारतीच्या गच्चीवरील भागातून एक लोखंडी रॉड अचनकपणे खाली उभ्या असलेल्या चार चाकी वाहनावर आणि एका पादचारी व्यक्तीच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत वाहनाचे नुकसान झालेच, पण यासोबतच अनुभव त्रिवारी (36) या पादचाऱ्याच्या हाताची बोटे तुटली असून त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्या व्यक्तीला जखमी अवस्थेत तत्काळ नजीकच्या जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (An iron rod fell from a tall building Pedestrians fingers broken hand fractured)

हेही वाचा – रामदास कदम यांना हटवा अन्यथा…, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदाधिकाऱ्यांचा इशारा

- Advertisement -

यापूर्वीही, जोगेश्वरी येथे 14 मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावरील लोखंडी रॉड रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षावर कोसळून एक महिला व तिची 9 वर्षीय मुलगी जखमी झाल्याची घटना 11 मार्च 2023 रोजी घडली होती. मात्र त्यानंतरही इमारत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांकडून ‘लोखंडी रॉड’बाबत आवश्यक ती सुरक्षिततेबाबत काळजी घेतली जात नसल्याने आणि पालिका प्रशासनही बिल्डरांना कडक शब्दात सूचना देत नसल्याने या बेफिकीर वृत्तीचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. या घटनांमुळे इमारतींवरील लोखंडी रोड व सुरक्षितता याबाबतचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी, अँनी बेझट रोड, जीओ डिजिटल स्टोर, सिटी बेकरीजवळ आविष्कार हाईट्स या तळमजला अधिक 32 मजली इमारतीच्या टेरेसवरुन एक लोखंडी रॉड आज (19 ऑगस्ट) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इमारतीखालील चार चाकी वाहनांवर अचनाकपणे कोसळला. यावेळी रस्त्यावरून जाणारे पादचारी अनुभव त्रिवारी (36) यांच्या हाताला या लोखंडी रॉडचा मोठा फटका बसला. त्यांचा हात फॅक्चर झाला व त्यांच्या हातीची बोटेही तुटली आहेत. त्यांना स्थानिक नागरिकांनी लागलीच मदत करून नजीकच्या जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Metro-Mono : मेट्रो, मोनोला महिन्याला कोट्यवधीचा तोटा; काय आहे कारण?

जोगेश्वरी येथील ‘ त्या’ घटनेची पुनरावृत्ती

जोगेश्वरी (पूर्व), स्टेशन रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे एसआरए योजनेच्या अंतर्गत एआयएम परेडाईज या 14 मजली बिल्डिंगचे काम सुरू असताना इमारतीच्या स्लॅबसाठी खालून लोखंडी रॉडचा टेकू देण्यात आला होता. मात्र 11 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सदर लोखंडी रॉड सातव्या मजल्यावरून अचानकपणे स्लॅबखालून सटकला आणि सुरक्षिततेसाठी लावलेली जाळी फाडून रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर (एमएच – 02 ईएफ 5999) कोसळला होता. या रिक्षामध्ये बसलेल्या क्षमा बानू आसिफ शेख (28) आणि सोबतच्या आयात आसिफ शेख (9) यांच्या अंगावर हा लोखंडी रॉड पडल्याने त्या दोघीजणी गंभीर जखमी झाल्या होत्या. या दुर्घटनेत रिक्षावाला वाचला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -