घरमहाराष्ट्ररामदास कदम यांना हटवा अन्यथा..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदाधिकाऱ्यांचा इशारा

रामदास कदम यांना हटवा अन्यथा…, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदाधिकाऱ्यांचा इशारा

Subscribe

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची तक्रार सुद्धा पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वर्षा निवासस्थानी जाऊन केली आहे.

मुंबई : जून 2022 रोजी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली. त्यानंतर त्यांनी 40 शिवसेनेचे आमदार आणि 10 अपक्ष आमदार यांच्यासोबतीने भाजपशी हात मिळवणी केली आणि आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह देखील मिळवले. जेव्हापासून शिंदे यांनी बंडखोरी केली आहे तेव्हापासून ते ठाकरे गटाला धक्के देण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनातील अनेक नेत्यांनी त्यांनी आपल्या गोटात सहभागी करून घेतले आहे. असेच ठाकरेंचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी मंत्री रामदास कदम यांनी देखील बंडखोरीच्या घटनेच्या लगेच शिंदे गटात प्रवेश केला आणि उद्धव ठाकरे कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले. सध्या शिंदे गटात शिवसेनेच्या नेतेपदी कार्यरत आहेत. ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना पक्षात मान सन्मान दिला जात आहे. पण याच रामदास कदम यांच्याविरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारल्याची माहिती समोर आली आहे. (Remove Ramdas Kadam, officials warn CM Eknath Shinde)

हेही वाचा – ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी पाळली लोकं, राज ठाकरेंचा खोचक टोला

- Advertisement -

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची तक्रार सुद्धा पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वर्षा निवासस्थानी जाऊन केली आहे. त्यामुळे शिंदे गटातील आणखी एक नाराजी नाट्य समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळे मुंबई उपनगरातील मालाड, कांदिवली आणि चारकोप येथील 40 कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले राजीनामे पाठवले होते. त्यामुळे कदमांच्या पुत्राने मुख्यमंत्री शिंदे यांची डोकेदुखी वाढवली होती. पण आता खुद्द रामदास कदम यांच्यामुळेच कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

मुंबईतील शिवसेनेच्या अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी आणि गोरेगाव भागातील जवळपास 300 नाराज पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 18 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली व्यथा आणि रामदास कदम यांच्याकडे देण्यात येणाऱ्या त्रासाचा पाढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर वाचला. शिवसेना नेते रामदास कदम आम्हाला शिवीगाळ करतात, आम्हाला पक्षातून काढून टाकण्याची धमकी देतात, असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

रामदास कदम यांच्याकडून देण्यात येणाऱ्या त्रासाला वैतागून आता कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. ‘रामदास कदम यांना हटवा अन्यथा आम्ही आमच्या पदाचे राजीनामे देतो,’ असे पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शांत राहण्याचा सल्ला देत नाराज पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. तसेच त्यांना राजीनामे न देण्याचे आवाहनही केले असून आता मुख्यमंत्री हे रामदास कदम आणि त्यांच्या मुलांविरोधात कुठली कारवाई करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -