Eco friendly bappa Competition
घर भविष्य साप्ताहिक राशीभविष्य राशीभविष्य रविवार २० ऑगस्ट ते शनिवार २६ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य रविवार २० ऑगस्ट ते शनिवार २६ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष –
या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश आणि चंद्र, शुक्र युती होत आहे. संततीच्या प्रगतीची बातमी मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य तुम्हाला मिळेल. धंद्यात मजूरवर्गाची समस्या येऊ शकते. गुंतवणूक करण्याची घाई करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात चर्चेतून तणाव निर्माण होऊ शकतो. तुमचे वक्तव्य परिस्थितीला धरून असले तरी सर्वांनी पटवून घेणे महत्त्वाचे असते. तुम्ही जिद्द सोडू नका. कला-क्रीडा-शिक्षण क्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील. नवीन परिचयाने तुमचा उत्साह वाढेल. सप्ताहाच्या मध्यावर संशोधन कार्यात अडचणी येतील. नम्रता ठेवा. राग आवरा. वरिष्ठांची मर्जी राखा. शुभ दि. २०, २४

वृषभ –
या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश व सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. घरातील वादविवाद समजुतीने संपवा. धंद्यात लक्ष दिल्यास चुका कमी होतील. कामधंद्याची रेषा ओलांडू नका. नोकरीतील ताण कमी होईल. राजकीय-सामाजिक कार्यात ठरविलेले कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सप्ताहाच्या शेवटी पोलीस यंत्रणेचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. कला-क्रीडा-शिक्षण क्षेत्रात वाकड्या वाटेने जाऊ नका. मेहनत घेतल्यास टिकून राहाल. व्यसन करू नका. कोर्टकेसमध्ये प्रयत्नशील रहा. पैसे दुप्पट होतील या भ्रमात राहू नका. शुभ दि. २१, २५

- Advertisement -

मिथुन –
या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश व चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. हाती घेतलेले कोणतेही काम पूर्ण करण्याचा उत्साह आणि आत्मविश्वास तुमच्याकडे राहील. धंद्यात मोठी संधी मिळेल. थकबाकी वसूल करून घ्या. नवीन मोठ्या व्यक्तींचा परिचय होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुम्हाला महत्त्वाची कामगिरी पूर्ण करावी लागेल. पदाधिकार मिळेल. आप्तेष्ठ, मित्र यांचे सहकार्य मिळेल. मुलांच्या हिताचा निर्णय घेऊ शकाल. कला-क्रीडा-शिक्षणात दिशा मिळेल. पोलीस खात्यातील व्यक्तीचे वर्चस्व वाढेल. व्यसनी लोकांचा सहवास टाळा. कोर्टकचेरीचा मामला लवकर संपवा. शुभ दि. २२, २६

कर्क –
या सप्ताहात तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र युती होत आहे. धंद्यातील तणाव कमी होईल. मोठे कंत्राट मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यातील समस्या सोडवण्यात यश मिळेल. वरिष्ठांच्या मनातील गैरसमज दूर करू शकाल. घरातील व्यक्तींची नाराजी कमी होऊन उत्साहाचे वातावरण होईल. कला-क्रीडा-शिक्षण क्षेत्रातील पिछेहाट दूर सारून प्रगतीचा नवा मार्ग मिळेल. नोकरीतील चूक सुधारून घेता येईल. कोर्टकचेरीच्या कामात नवीन मुद्दे हाती येतील. तब्येत उत्तम राहील. परदेशात नोकरीचा प्रयत्न करताना वाकडी वाट धरू नका, जमिनीसंबंधी काम करता येईल. शुभ दि. २०, २३

- Advertisement -

सिंह –
या सप्ताहात कर्क राशीत सूर्याचे राशांतर, बुध, प्लुटो षडाष्टक योग होत आहे. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. धंद्यात वाद व गैरसमज होऊ शकतो. मोठी गुंतवणूक कुणाच्या गोड बोलण्यावरून करू नका. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे धोरण सत्य असले तरी व्यक्त करण्यासाठी मोठी हिंमत ठेवावी लागेल. दबाव येईल. मोलाचे क्षण दाखवले जातील. नोकरीत गुप्त कारवायांचा कट होऊ शकतो. तुमचे मनोधैर्य टिकून राहील. कला-क्रीडा-शिक्षण क्षेत्रात यशासाठी कष्ट पडतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. पोलीस खात्यातील व्यक्तींना डाव टाकताना सावध राहावे लागेल. शुभ दि. २१, २४

कन्या –
या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला घरात वाद होईल. जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील तणाव होईल. राग आवरा. राजकीय-सामाजिक कार्यात योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. जनतेला तुमच्या बाजूने करण्याची जिद्द ठेवा. धंद्यात प्रगती व पैसा मिळेल. थकबाकी वसूल करा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. वरिष्ठ खूश होतील. तुम्ही घेतलेली भूमिका कौतुकास्पद ठरू शकते. कला-शिक्षण क्षेत्रात चमकाल. पोलीस खात्यातील व्यक्तींना दिशा मिळेल. चांगला क्लू मिळेल. शुभ दि. २२, २६

तूळ –
या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र युती होत आहे. ग्रहांची साथ असताना माणसाने केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. धंद्यात सुधारणा करू शकाल. नवीन ओळख होईल. प्रेमाला चालना मिळेल. संसारातील वातावरण आनंदी राहील. नोकरीसाठी प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाची भूमिका निभावता येईल. पूर्वी केलेल्या चुका सुधारता येतील. नव्या उमेदीने तुम्ही पुढे जाऊ शकाल. परदेशात जाण्याचा योग येईल. कला-क्रीडा शिक्षण क्षेत्रात दिशा मिळेल. सप्ताहाच्या मध्यावर रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासाचा बेत आखाल. वाहन जपून चालवा. शुभ दि. २०, २२

वृश्चिक –
या सप्ताहात कर्क राशीत सूर्याचे राशांतर, चंद्र, मंगळ, त्रिकोणयोग होत आहे. कुठेही तुम्हाला सहजपणे यश मिळेल असे समजू नका. मेहनत घ्या. संयम ठेवा. मोठेपणाच्या नादात न राहता राजकीय-सामाजिक कार्यात काम करा. कल्पनेच्या नादाने आपण जग बदलू शकत नाही. ‘जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती’ हा निसर्गाचा नियम आहे. धंद्यात सुधारणा होेईल. नोकरीमधील तणाव कमी होईल. कामात सहकारी मदत करतील. तब्येत उत्तम राहील. कला-क्रीडा-शिक्षण क्षेत्रातील चुका सुधारता येतील. वातावरण उत्साहवर्धक राहील. कौटुंबिक समस्या येईल. नवीन मित्र भेटतील. शुभ दि. २१, २३

धनु –
या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश व चंद्र, शुक्र युती होत आहे. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. अधिकारी वर्गाशी सल्ला मसलत करा. धंद्यात अचानक खर्च वाढेल. यंत्रणेत बिघाड संभवतो. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास असला तरी वरिष्ठ त्यावर संशयाची सुई ठेवण्याची शक्यता आहे. गुप्त गोष्टी कोणाच्या जवळ बोलायच्या याचे भान ठेवा. वाटाघाटीत कुटुंबात तणाव होऊ शकतो. कला-क्रीडा-शिक्षणात नावलौकिकावर गदा येऊ शकते. पोलीस खात्यातील व्यक्तींची संशोधन कार्यात दिशाभूल होऊ शकते. शुभ दि. २२, २४

मकर –
या सप्ताहात कर्क राशीतील सूर्य राशांतर, बुध-प्लुटो षडाष्टक योग होत आहे. तुमच्या कार्यातील बर्‍याच अडचणी कमी करू शकेल. घरातील व्यक्तींशी चर्चा करताना रागाचा पारा वाढू शकतो. रागावर संयम ठेवा. गैरसमज होऊ शकतो. शांततेतून मार्ग निघेल. धंद्यात काम मिळवून ठेवा. थकबाकी मिळवा. राजकीय-सामाजिक कार्यात जम बसेल. पकड तशीच ठेवा. नातलग, मित्र कदाचित नाराज होऊ शकतात. कला क्षेत्रात तडतोड करावी लागेल. क्रीडा-शिक्षण क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. प्रवासाचा बेत आखाल. तब्येत उत्तम राहील. कोर्ट केसमध्ये सोमवार, मंगळवार सावध रहा. शुभ दि. २३, २५

कुंभ –
या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, बुध, प्लुटो षडाष्टक योग होत आहे. तुमच्या बोलण्याचा उद्देश किती चांगला असला तरी विरोधक त्यातून गैरअर्थ काढण्याचा प्रयत्न सप्ताहाच्या मध्यावर जरूर करतील. त्यांचा गैरसमज दूर कराल. धंद्यात समस्या येईल. मार्ग निघेल. राजकीय-सामाजिक कार्यात दबाव राहील. मित्र-नातलग यांचे सहकार्य मिळेल. संततीकडून मदत मिळेल. घरात गोड बातमी मिळेल. कला-क्रीडा-शिक्षण क्षेत्रात अस्थिरता राहील. प्रतिष्ठा जपा. कोर्टकेसमध्ये गुप्त कारवायांचा त्रास होईल. प्रवासात घाई नको. वाहन हळू चालवा. वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. शुभ दि. २४, २६

मीन –
या सप्ताहात कर्क राशीत सूर्य प्रवेश, सूर्य, चंद्र लाभ योग होत आहे. हा सप्ताह तुमच्या परीक्षेचा कालावधी ठरणार आहे. धंद्यात काम मिळेल. पैसा मिळेल. मानसिक दबाव राहील. संसारात विरोध, वाद होईल. जवळच्या व्यक्तीविषयी चिंता वाटेल. कोणताही वाद टोकाला जाऊ शकतो. राजकीय-सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. वरिष्ठ मदत करतील. वेळ प्रसंगाचे भान ठेवा. अडचणी येतील. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. कला-क्रीडा-शिक्षण क्षेत्रात सावधपणे रहा. विरुद्ध लिंगी व्यक्तीच्या फंदात पडू नका. व्यसनाने अडचणी वाढतील. कोणतेच व्यसन करू नका. शुभ दि. २०, २१

- Advertisment -