घरमहाराष्ट्रमराठीचा मद्दा पुन्हा एकदा पेटला; मुलुंडनंतर आता कांदिवलीत जागा हडपण्याचा प्रयत्न

मराठीचा मद्दा पुन्हा एकदा पेटला; मुलुंडनंतर आता कांदिवलीत जागा हडपण्याचा प्रयत्न

Subscribe

कांदिवली परिसरात BMC मधून निवृत्त झालेल्या एका महिला अधिकाऱ्याची जागा हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतची व्यथा मांडणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईत मराठी माणसांवर या ना त्या कारणाने अन्याय, अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मुलुंडमध्ये घर नाकारल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कांदिवलीमध्ये मराठी माणसाचे घर हडपण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी वेळीच दखल घेत न्याय मिळवून दिला आहे.(Marathi issue flared up once again After Mulund now trying to grab seat in Kandivali)

कांदिवली परिसरात BMC मधून निवृत्त झालेल्या एका महिला अधिकाऱ्याची जागा हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतची व्यथा मांडणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. मनसेकडून याची दखल घेण्यात आली आणि पदाधिकारी दिनेश साळवी आणि त्यांच्या टीमने तत्काळ पावले उचलत पोलिसांकडे धाव घेतली.
मुंबईच्या मुलुंड परिसरात मराठी माणसाला जागा नाकरण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कांदिवली येथे एका मराठी माणसाच्या जागा हडप करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत याविरोधात पोलिसांत धाव घेतली. या घटनेबाबत मनसेकडून एक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कोकण रेल्वे मार्गाबाबत मोठी अपडेट; ‘या’ वेळेपर्यंत सुरू होऊ शकते वाहतूक

सगळी यंत्रणा राज ठाकरे यांच्याकडेच द्या ना

पुन्हा तेच! स्थळ बदलले, आधी मुलुंड आता कांदिवली; मराठी माणसाची जागा हडपण्याचा प्रयत्न; पोलीस मदत करणार नसतील. प्रत्येक ठिकाणी मनसे मदतीला धावणार असेल तर, सगळी यंत्रणा राज ठाकरे यांच्याकडेच द्या ना, अशी उद्विग्न प्रतिक्रिया या मराठी महिलेने व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा : मुलाचे नाव ठेवण्यावरून पती-पत्नी जाम भांडले अन् कोर्टानेच केलं बाळाचं बारसं

व्हायर झालेल्या व्हिडीओमध्ये काय आहे? वाचा-

बीएमसीमधून निवृत्त झालेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव रीटा दादरकर असून, त्यांच्या प्रॉपर्टीवर गुजराती माणसाने डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत एका व्हिडिओतून रीटा दादरकर यांनी आपली व्यथा मांडली. बोरिवली, कांदिवली येथे १९४४ पासून आमच्या प्रॉपर्टी आहेत. स्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या या जागा आहेत. आजच्या घडीला परमार नामक व्यक्तीने यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इलेक्ट्रिक मीटर तोडला आहे. आत माणसे घुसवली. त्याचा व्हिडिओ आहे. पोलीस मात्र काहीच ठोस अॅक्शन घेत नाहीत. मराठी माणसाने खरोखरच जगायचे आहे की नाही, हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना विचारण्याची वेळ आली आहे. पोलीस यंत्रणा योग्य काम करणार नसेल तर, त्यांची काही गरज नाही. त्यांना मिळणारा पैसा आमच्या करातून मिळत आहे. असे ऐकिवात आहे की, पोलिसांना सेट केले आहे. अशाने एकाही मराठी माणूस मुंबईत राहणार नाही. मला मनसेने मदत करण्याचा खूप प्रयत्न केला. हा प्रश्न साधा नाही. प्रत्येक ठिकाणी मराठी माणसावर अन्याय होईल आणि प्रत्येक ठिकाणी राज ठाकरेंची माणसे मदतीला धावतील. असे असेल तर पोलीस कशाला हवेत, सगळी यंत्रणा राज ठाकरे यांच्याकडेच द्या ना, असे रीटा दादरकर यांनी एका व्हिडिओत म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -