घरमुंबईआर्यनच्या जामीनासाठी काऊंटडाऊन सुरु, आर्थर रोड तुरुंगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

आर्यनच्या जामीनासाठी काऊंटडाऊन सुरु, आर्थर रोड तुरुंगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

Subscribe

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आज शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आर्थर रोड कारागृहातून आज जामीन देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्यन खान केव्हा तुरुंगाबाहेर येतो याकडे साऱ्यांच लक्ष आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनच्या जामीनाची प्रत जारी केली आहे. आर्थर रोड तुरुंग प्रशासनाला ही ५ पानांची ऑर्डर प्रत मिळाल्यानंतर जामीनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. आर्यन खानला १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मिळाला आहे. आर्यनच्या जामीनसाठी जमीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला सत्र न्यायालयात दाखल झाली आहे.

सूर्यास्तापूर्वी आर्यनच्या जामीनाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत आर्यन तुरुंगाबाहेर येऊ शकतो. आर्यन खानसह अरबाज मर्चंड, मुनमुन धमेचा यांनाही आजचं जामीन मिळणार आहे.

- Advertisement -

आर्थर रोड तुरुंगाबाहेर सशस्त्र पोलीस दलाची तुकडी तैनात 

त्यामुळे आर्थर रोड तुरुंगाबाहेर गर्दी वाढू लागली असून पोलिसांचा मोठी फौजफाटा तैनात केला आहे. पुढच्या २ तासांत आर्यन खान आर्थर रोड कारगृहाबाहेर येणार असल्याने परिसरात गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे आर्थर रोड तुरुंगाबाहेर  वाहनांची गर्दी वाढू नये यासाठी पोलिसांकडून गर्दी हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय माध्यमांची देखील मोठी गर्दी तुरुंगाबाहेर जमली आहे. तुरुंगाच्या गेटपासून सर्वांना दूर राहण्यासाठी पोलिसांकडून आवाहन केले जात आहे. आर्थर रोड तुरुंगाबाहेर जवळपास १ किलोमीटर परिसरात आर्यन खानला पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने गर्दी केली आहे.

तुरुंग प्रशासनाचे सर्व अधिकारी परिसरात दाखल झाले असून थोड्याच वेळात त्याच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण होईल. मात्र सतत वाढणारी गर्दी रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सशस्त्र पोलीस दलाची एक टीम आर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झाली आहे.

- Advertisement -

मन्नत बाहेरील सुरक्षा वाढवली

आर्यन खान काही वेळात मन्नतवर पोहचणार असल्याने चाहत्यांनी बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आर्यनला आणण्यासाठी मन्नत बंगल्यातून दोन गाड्या रवाना झाल्या आहेत. मात्र मन्नतबाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आणि बॉरिकेट्स लावण्यात आल आहेत. तसेच बंगल्याबाहेर अनावश्यक गर्दी वाढू यासाठी नागरिकांना बाजूला केले जात आहे.

७ अटींवर आर्यनला मिळाला जामीन

१) आर्यन या प्रकरणातील अन्य कोणत्याही आरोपीशी संपर्क साधणार नाही.

२) पुराव्याशी छेडछाड करणार नाही.

३) आपला पासपोर्ट स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जमा करा.

४) प्रसारमाध्यमांमध्ये भाषणबाजी करणार नाही.

५) न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडणार नाही.

६) एनसीबीला गरज पडेल तेव्हा सहकार्य करेल.

७)यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द करण्यात येईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -