घरताज्या घडामोडीDrugs case : काशिफ खानचे नवाब मलिकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर, म्हणाला मी साधी...

Drugs case : काशिफ खानचे नवाब मलिकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर, म्हणाला मी साधी सिगारेटही…

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काशिफ खान हा क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा आयोजक असल्याचा आरोप केला होता. समीर वानखेडे आणि काशिफ खान हे मित्र आहेत असा आरोपही नवाब मलिकांनी केला होता. मलिकांच्या आरोपावर काशिफ खानने प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिकांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असल्याचे त्याने सांगितले. तसेच मी साधी सिगारेटही ओढत नाही मलिक माझ्यावर का आरोप करत आहेत याची आपल्याला कल्पना नाही असे काशिफ खान याने म्हटलं आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टीचा काशिफ खान आयोजक असताना प्रायोजक म्हणून सहभागी झाला होता असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. मलिकांच्या आरोपांवर काशिफ खान याने प्रतिक्रिया दिली आहे. काशिफ खान याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये आपला काही संबंध नसल्याचे सांगितले आहे. तसेच आपण त्या पार्टीचे आयोजक नसून केवळ सहभाग घेतला होता असे काशिफ खान याने सांगितले आहे. तसेच क्रूझ पार्टीचे आयोजन आपण केलं नाही. मंत्री नवाब मलिकांना चुकीची माहिती दिली आहे. त्यांना मी ओळखत नाही तसेच कधी भेटलोही नाही त्यामुळे मला माहिती नाही या प्रकरणात मला का ओढण्यात येत आहे. असे काशिफ खान म्हणाला आहे.

- Advertisement -

वानखेडेंशी ओळख नाही

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा काशिफ खान मित्र आहे. त्यामुळे काशिफ खानला क्रूझवर अटक करण्यात आली नाही असा आरोप मलिक यांनी केला आहे. परंतु हा आरोप देखील काशिफ खान याने फेटाळला आहे. समीर वानखेडे यांना आपण ओळखत नाही. त्यांना कधीही भेटलो नाही परंतु नवाब मलिक माझ्यावर का आरोप करत आहेत याबाबत त्यांना विचारले पाहिजे असे वक्तव्य काशिफ खान याने केलं आहे.

नवाब मलिकांचा आरोप काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एनसीबीने केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप केला आहे. तसेच समीर वानखेडे यांनी मोजक्या लोकांना अटक केली असून काही लोकांना सोडलं आहे. यामध्ये काशिफ खान याला देखील वानखेडेंनी अटक केली नाही. वानखेडे आणि काशिफ खान हे मित्र आहेत आणि ड्रग्ज पार्टीचे आयोजन काशिफ खान याने केलं असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : गृह खातं तुमच्याकडे काय करायचे ते करा, चंद्रशेखर बावनकुळेंचं नवाब मलिकांना आव्हान


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -