घरमुंबईदारू पिण्यास नकार दिला म्हणून तरुणाला चाकूने भोसकले

दारू पिण्यास नकार दिला म्हणून तरुणाला चाकूने भोसकले

Subscribe

दारू पिण्यास नकार दिला म्हणून एका तरुणाला त्याच्याच मित्राने चाकूने भोसकल्याची घटना शुक्रवारी रात्री विलेपार्ले परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या मणी बाबू देवेंद्र याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून आरोपी मित्र सतीश देवेंद्र याला अटक केली आहे. याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी सांगितले.

ही घटना शुक्रवारी रात्री अकरा ते साडेअकरा वाजता विलेपार्ले येथील नेहरुनगर, अण्णा चाळीतील साईबाबा मंदिर परिसरात घडली. मणी देवेंद्र हा याच परिसरातील साई मित्र मंडळ चाळीत राहतो. सतीश हा त्याचा मित्र असून तोदेखील त्याच परिसरात राहतो. शुक्रवारी सतीश हा दारू पिण्यासाठी साईबाबा मंदिरापासून काहीच अंतरावर बसला होता. यावेळी त्याने मणीला दारू पिण्यास सांगितले. मात्र मणीने त्याला नकार दिला होता. याच कारणावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात सतीशने त्याच्याकडील चाकूने मणीवर वार केले. पोटात गंभीर दुखापत झाल्याने मणी हा जागीच कोसळला होता.

- Advertisement -

काही तासांतच अटक
या हल्ल्यानंतर सतीश हा तेथून पळून गेला. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी मणीला पोलिसांनी कूपर रुग्णालयात दाखल केले, तिथेच त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मणीच्या जबानीवरून जुहू पोलिसांनी सतीशविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सतीश देवेंद्रला पोलिसांनी काही तासातच अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -