घरमुंबईमोदी सरकारने ताजमहल बनवून दाखवावा - ओवेसी

मोदी सरकारने ताजमहल बनवून दाखवावा – ओवेसी

Subscribe

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा राम मंदिरचा मुद्दा बाहेर काढत असून लोकांना मुख्य मुद्यांपासून दूर करण्यासाठी भाजप आणि संघ राम मंदिराच्या मुद्यावर बोलत असल्याचे वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी केले.

‘मोदी सरकारने ताजमहाल बनवून दाखवावा’, असे आव्हान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांना दिले. ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या मुंबई मंथन या कार्यक्रमाच्या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात ओवेसी आणि शाहनवाज हुसैन यांच्यात चांगली जुगलबंदी जुंपली. चर्चासत्रात ओवेसी यांच्या आव्हानाला उत्तर देताना शाहनवाज म्हणाले की, ‘मोदी सरकार ताजमहाल बनवण्यापेक्षा गरीब जनतेचे स्वत:चे आणि हक्काचे घरे बांधण्याला जास्त महत्व देते’.

संघाला सरकारला निदर्शने देण्याचा हक्क आहे का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या महोत्सवात संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी दिलेल्या भाषणात राम मंदिरचा मुद्दा काढला होता. राम मंदिर लवकर बनावे, असं देखील भागवत म्हणाले होते. या मुद्यावरही असदुद्दीन ओवेसी आणि शाहनवाज हुसैन यांच्यात चर्चेमध्ये वादविवाद झाले.

- Advertisement -

भाजपचा महत्त्वाच्या मुद्यांना दूर करण्याचा प्रयत्न

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ‘निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा राम मंदिरचा मुद्दा बाहेर काढत आहे. लोकांना मुख्य मुद्यांपासून दूर करण्यासाठी भाजप आणि संघ राम मंदिराच्या मुद्यावर बोलत आहे. देशात राफेल घोटाळा, एम. जे. अकबर यांच्यावरील आरोप तसेच इतर अनेक महत्वाचे मुद्दे असताना भाजप जाणूनबूजून राम मंदिराचा विषय समोर आणत आहे’. शिवाय, भाजप सरकारच्या कार्यकाळात मुस्लिम जनता असुरक्षित असल्याचेही ओवेसी म्हणाले.


हेही वाचा – निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारिप – एमआयएम युती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -