घरमुंबईआशिष शेलारांना एक लाखाचा ऑनटेबल जामीन; कोर्टात याचिका

आशिष शेलारांना एक लाखाचा ऑनटेबल जामीन; कोर्टात याचिका

Subscribe

एका आक्षेपार्ह वक्तव्यावरून महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्यातील वाद आता पोलीस ठाणे आणि कोर्टापर्यंत पोहोचला आहे. पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गुरुवारी आशिष शेलार यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर शेलार यांना एक लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, शेलार यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत महापौरांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची याचिका केली आहे.

‘जी केस बनूच शकत नाही ती केस बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारे आहोत, न्यायिक व्यवस्थेला मानणारे आहोत. त्यामुळे खोटा का होईना गुन्हा त्यांनी काल दाखल केला त्याबद्दल मी जामीन घेतला. त्याबरोबरीने मुंबई हायकोर्टात हा एफआयआर क्वॅश केला पाहिजे, यासाठी मी क्वॅशिंग पिटिशनही दाखल केली आहे. त्याची कॉपीही पोलीस ठाण्यात दिली आहे.

- Advertisement -

न्यायिक व्यवस्थेतून सत्य मी बाहेर आणेन, पण यांना पुन्हा मी सांगू इच्छितो की, आम्ही सगळे सहकारी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाविरोधात संघर्ष अजून कडवा करु. तुम्ही जेवढा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, भारतीय जनता पार्टी तो आवाज अजून उचलेल आणि तुमची कृष्ण कृत्य जनतेसमोर उघड करु’, असा इशारा शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

फडणवीसांकडून समर्थन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेलारांची पाठराखण केली आहे. आशिष शेलार महिलांचा अवमान करूच शकत नाहीत. महापौरांविषयी तर अजिबातच नाही. त्यांच्या प्रेसनोटचा, वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. महापौरांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, असे ते म्हणालेत. ते शिवसेनेच्या विरोधात सातत्याने बोलतात, म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -